शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकमांची साक्ष नोंदवा, बचाव पक्षाची मागणी

By admin | Updated: June 22, 2017 23:34 IST

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून खटल्यात बचाव पक्षानं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 22 - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून खटल्यात बचाव पक्षानं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी कोर्टात साक्षीदारांची एक यादी दिली. विशेष म्हणजे या यादीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचंही नाव होतं. कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तपासावर बचाव पक्षाला आक्षेप होता. खटला उभा राहिल्यानंतर सरकारी वकील काम सुरू करतात. मात्र खटल्यात सरकारी वकिलांनी काम सुरू केलं नसल्याचा दावा बाळासाहेब खोपडे यांनी केला आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय. विशेष म्हणजे भारतीय न्यायदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांची साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तर  कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांची न्यायालात चार तास मॅरेथॉन चौकशी झाली़ असून, सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 26 साक्षीदारांची तपासणी झाली आहे. अजून तीन जणांच्या साक्षी नोंदविल्या जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आता अॅड. उज्ज्वल निकम यांचीच साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. 

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असून, सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक गवारे यांची साक्ष घेतली़, गवारे यांनी अत्याचार आणि खुनाशी संबंधित तक्रार व तपासाची माहिती दिली आहे.

कोपर्डी घटनेतील आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे याला 15 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या जबाबानंतर या घटनेत संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही दोन दिवसांच्या अंतराने अटक करण्यात आली़ होती. शिंदे याच्या घराची झडती घेतली होती, तेव्हा तेथे मोबाईल व काही अश्लील सीडी आढळून आल्या होत्या.