शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकणची राखरांगोळी होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:54 IST

कोकण हा निसर्गरम्य आहे. मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षडयंत्र रचले असून शिवसेना त्याला विरोध करील.

राजापूर (जि. रत्नागिरी) : रिफायनरीसारखे कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेवून शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.सोमवारी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सागवे येथील कोचाळी मैदानावर नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्तांसाठी सभा झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करीत असल्याची घोषणा केली. उपस्थितांनी त्याचे जोरदार स्वागत केले. देसाई यांच्या त्या घोषणेचा आधार घेवून पक्षप्रमुख ठाकरे यांनी शासनावर जोरदार टीका केली.कोकण हा निसर्गरम्य आहे. मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षडयंत्र रचले असून शिवसेना त्याला विरोध करील. मुख्यमंत्र्यांनी गुजरात अथवा नागपूर, हवा तिकडे हा प्रकल्प न्यावा. पण असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. उद्योगमंत्र्यांनी ती अधिसुचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता येथील भूमीत तो प्रकल्प होणार नाही. नाणार परिसरातील शेतकरीबांधव, बागायतदार, मच्छीमार यांना देशोधडीला लावून कोकणचा विकास नको आहे, असे ठाकरे म्हणाले. नाणार परिसरात मोदी, शहा, जैन अशी मंडळी कधीच वास्तव्याला नसताना मग आताच ही मंडळीआली कोठून? परप्रांतातील मंडळींना अगोदर प्रकल्पाची माहिती कशी मिळाली? असे सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. यावेळी रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, मज्जीद भाटकर, नाणारचे सरपंच ओमकार प्रभुदेसाई, भाई सामंत यासहित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीजर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले होते. मात्र केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाशी सामंजस्य करार केला. त्यावरुन मुख्यमंत्र्यांना कुणीच विचारीत नाही व त्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे