शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतीकरण पूर्ण; कोकण रेल्वेवर आता नाही ‘धुरांच्या रेषा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 09:35 IST

गुरुवारपासून गाड्यांना विजेचे इंजिन, या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत.

मुंबई : भारतीय रेल्वेमार्गांवरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम केले असून, देशातील सर्वांत मोठे रेल्वेचे विद्युतीकरण कोकण रेल्वेमार्गावर केले आहे. चाकरमान्यांच्या हक्काची असलेली कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या गुरुवारपासून कोकणात जाणाऱ्या  दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस पूर्णपणे विद्युत इंजिनावर चालविण्यात येणार आहेत.  कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ९७० कि.मी. लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले आहे. 

या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते रोह्यापर्यत विद्युतीकरण असल्याने विद्युत्प्रवाहावरील इंजिने मेल, एक्स्प्रेस गाड्यांना चालविण्यात येत होती. रोहा स्थानकांपुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेल इंजिन जोडून गाड्या मार्गस्थ कराव्या लागत होत्या; मात्र, आता विद्युतीकरण पूर्ण झाल्याने टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या विद्युत इंजिनावर धावणार आहेत. 

कधी लागणार विद्युत इंजिन? आता टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस, २० सप्टेंबर रोजी मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, १५ ऑक्टोबर रोजी  जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस,  १ जानेवारी २०२३ रोजी  मुंबई-मेंगलोर एक्स्प्रेस या गाड्यांना विद्युत इंजिन लागणार आहे. 

मुंबई-कोकण मार्गावर अप-डाऊन एकूण गाड्या २० देशातून एकूण ३७ रेल्वेगाड्यांची वाहतूकरेल्वेच्या विद्युतीकरणाला २०१६ रोजी रेल्वे मंत्रालयाची मंजुरीरत्नागिरी ते थिविम या दरम्यान विद्युतीकरण    ९७० कि.मी. लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण विद्युतीकरणासाठी एकूण १२८७ कोटीं रुपयांचा खर्च 

इंधनाची होणार बचत १२ डब्यांच्या रेल्वेगाडीच्या एका किलोमीटरसाठी साधारणपणे ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो. विजेवर प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिझेलची बचत होईल. इंधनावरही वर्षाला साधारणत १५० ते २०० कोटी रुपये खर्च होतो. विद्युतीकरणामुळे  प्रवाशांना प्रदूषणमुक्त वातावरणात रेल्वे प्रवास शक्य होणार आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वे