शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे ‘ब्लॉग’वर धावणार

By admin | Updated: June 19, 2017 02:35 IST

भारतीय रेल्वेने डिजिटायझेशनच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यानुसार, कोकण रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत, ब्लॉग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महेश चेमटे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय रेल्वेने डिजिटायझेशनच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यानुसार, कोकण रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत, ब्लॉग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉगमध्ये कोकणाच्या संस्कृतीविषयी लिखाण आणि रेल्वेच्या कार्यक्रमावर ब्लॉग लिहिणाऱ्या ब्लॉगरला थेट टिष्ट्वट करून नेटिझन्सला आमंत्रणे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, कोकण पट्ट्यासह गोवा, कर्नाटक आणि केरळ येथील ब्लॉगरला कोकण रेल्वेने ब्लॉग लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.देशभर रेल्वेचे विश्वासार्ह आणि विस्तीर्ण जाळे पसरले आहे. रेल्वेचे डिजिटायझेशन केल्याने प्रवाशांभिमुख सोयी पुरवणे अधिक सोपे होईल, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत. या धर्तीवर कोकण रेल्वेवर ब्लॉग सुरू करण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियातून दर्जेदार लिखाण काही नेटिझन्सकडून करण्यात येते. या नेटिझन्सना ‘कोकण रेल्वे’च्या छताखाली ‘डिजिटल’ व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी, कोकण रेल्वेने ब्लॉगर्सना जाहीर आमंत्रणे दिली आहेत. ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन’च्या अधिकृत टिष्ट्वटरवरून टिष्ट्वट करून ही माहिती देण्यात आली आहे. रेल्वेने डिजिटायझेशनअंतर्गत रेल्वे हद्दीतील सर्व जमिनींचे रेकॉर्ड अद्ययावत करण्यासाठी ट्रॅक मॅनेजमेंट सीस्टिम (टीएमएस) हे वेब अ‍ॅप विकसित केले आहे. रेल्वेच्या स्थावर मालमत्तेचा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सीस्टिमच्या माध्यमातून (जीआयएस) नकाशा तयार करण्याचे काम वेगात आहे. इस्रोच्या ‘भुवन’ उपग्रहामार्फत रेल्वेचे टीएमएस अ‍ॅप कार्यरत आहे. हा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) दिल्ली येथे सुरू असून, लवकरच देशातील सर्व स्थानकांचा समावेश यात करण्यात येणार आहे.