शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार; प्रवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 06:31 IST

१ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक : पाऊस गेल्यामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पावसाळी वेळापत्रक बदलून आता १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. एक्स्प्रेस आपल्या नियमित वेगानुसार धावतील. त्यांचा वेग साधारण ताशी ९० ते ११० किमी. इतका असेल. नवीन वेळापत्रकानुसार गोवा तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील स्थानकांवरून मुंबईकडे जाणाºया गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. मात्र, मुंबईहून परतीच्या प्रवासाला निघणाºया या गाड्यांच्या वेळेत बदल होणार नाही.

नवीन वेळापत्रकाप्रमाणे मुंबईकडे जाणाºया गाड्यांच्या कणकवली स्थानकातील वेळा पुढीलप्रमाणे आहेत. मंगला एक्स्प्रेस पहाटे ५.४२ वाजता, दिवा पॅसेंजर सकाळी ९.२१ वाजता, मांडवी एक्स्प्रेस दुपारी ११.३३ वाजता, जनशताब्दी एक्स्प्रेस सायंकाळी ४.२८ वाजता, तुतारी एक्स्प्रेस सायंकाळी ७.४४ वाजता, कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री ९.०८, मेंगलोर एक्स्प्रेस रात्री ८.४० वाजता, डबलडेकर (मंगळवार, गुरुवार) सकाळी ८.१० वाजता , ओखा एक्स्प्रेस (गुरुवार, शनिवार) दुपारी १.३८ वाजता, पुणे एक्स्प्रेस (मंगळवार, शुक्रवार) सायंकाळी ७.१० वाजता, वातानुकूलित करमळी एक्स्प्रेस (गुरुवारी) दुपारी ३.२० वाजता, तिरूनेलवेल्ली-दादर एक्स्प्रेस (गुरुवार) सकाळी ६.२८ वाजता, बिकानेर एक्स्प्रेस (रविवार) सकाळी ६.२९ वाजता, डबलडेकर (दर रविवारी) दुपारी ३ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होईल.

‘कोकणकन्या’ ही सावंतवाडी स्थानकात मुंबईकडे जाण्यासाठी सायंकाळी ७.३६ वाजता, कुडाळ येथे रात्री ८.०९ वाजता, सिंधुदुर्गनगरी ८.२८ वाजता तर वैभववाडी येथे ९.३८ वाजता पोहोचेल. ‘तुतारी’ एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायंकाळी ६.५० वाजता सुटून कुडाळला ७.१० वाजता, सिंधुदुर्गनगरी येथे ७.३० वाजता पोहोचेल. ‘मांडवी’ एक्स्प्रेस ही सावंतवाडीला १०.४० वाजता, कुडाळला ११.०२ वाजता पोहोचेल.

‘नेत्रावती’ एक्स्प्रेस ही कुडाळला सकाळी ६.५० वाजता तर ‘तेजस’ एक्स्प्रेस कुडाळला ३.२८ वाजता येणार आहे. पावसाळी हंगामात सुरक्षिततेचा उपाय म्हणून गाड्यांचा वेग कमी करण्याबरोबरच गाड्यांच्या वेळेत बदल केला जातो. त्यामुळे गाड्यांना काहीसा विलंब होतो. आता पावसाळा संपत आल्याने वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.१० जून ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसमान्सून वेळापत्रकाप्रमाणे चालविल्या. आता कोकण रेल्वे मार्गावरील नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर ते १० जून या कालावधीसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेऊन नवीन वेळापत्रकाप्रमाणे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या सूत्रांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वे