शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या, या तारखेपासून सुरू होणार आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2023 11:06 IST

Special Trains Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध १२ मार्गावर या गाड्या सोडल्या जाणार आहेत, उत्सव काळात १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत या विशेष गाड्या धावणार आहेत.

मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड ही विशेष गाड़ी दररोज रात्री १२:२० वाजता सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी २:२० मिनिटांनी सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी ते मुंबई सीएसएमटी ही विशेष दैनिक गाडी सावंतवाडी रोड स्थानकातून दररोज दुपारी ३:१० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३५ वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचेल. दिवा जंक्शन ते रत्नागिरी ही मेमू स्पेशल दिवा जंक्शन येथून दररोज सकाळी ७:२० वाजता सुटेल, ती त्याच दिवशी दुपारी २:५५ वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाड्यालोकमान्य टिळक टर्मिनल ते कुडाळ दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात दोन्ही दिशेने चोवीस विशेष फेऱ्या होणार आहेत. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनलवरून रात्री १०:१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ९:३० वाजता कुडाळ स्थानकात पोहोचेल. त्याचप्रमाणे मुंबई ते मडगाव ही विशेष दैनिक गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. करमाळी पनवेल आणि पनवेल- करमाळी ही विशेष साप्ताहिक गाडी २६, २३ आणि ३० सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहे.

पुणे जंक्शन ते करमाळी विशेष साप्ताहिकपुणे जंक्शन ते करमाळी दरम्यान १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी विशेष साप्ताहिक गाडी सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ती दर शुक्रवारी सायंकाळी ६:४५ वाजता पुणे जंक्शनहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता करमाळीला पोहोचेल. त्याचप्रमाणे कुडाळ ते पुणे जंक्शन ही विशेष साप्ताहिक गाडी कुडाळ स्थानकातून २७, २४ सप्टेंबर तसेच २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:०५ वाजता सुटेल. ही गाडी त्यादरम्यानच्या स्थानकात थांबेल.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGaneshotsavगणेशोत्सव