शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पदवीधर निवडणूक : मुल्ला, मोरे यांच्यावर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:33 IST

येत्या २५ जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पदवीधरांचे प्रतिनिधित्व करूपाहणारे शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत...

ठाणे - येत्या २५ जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पदवीधरांचे प्रतिनिधित्व करूपाहणारे शिवसेना, भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत, तर राष्टÑवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल असून संजय मोरे यांच्यावरही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परंतु, भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यावर मात्र कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नसल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील शिवसेना, भाजपा आाणि राष्टÑवादीच्या तीन उमेदवारांमध्ये खरी लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या सर्वच उमेदवारांनी अलीकडेच आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राष्ट्रवादीचे मुल्ला यांच्यावर ठाणे शहरातील नौपाडा, ठाणेनगर, राबोडी, कासारवडवली आणि श्रीनगर पोलीस ठाण्यात २० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय, भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यान्वयेदेखील गुन्हा दाखल आहे. महानगर दंडाधिकारी माझगाव, महानगर दंडाधिकारी ठाणे आणि सत्र न्यायालय ठाणे येथे त्यांच्याविरोधात खटले सुरू आहेत. गुन्हेगारी कारस्थान रचणे, संपत्ती हडप करणे, फसवणूक करणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, खोटी कागदपत्रे तयार करून ती खरी भासवणे अशा भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे मुल्ला यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदला गेला आहे. मुल्ला यांनी बँक ठेवी, बंधपत्रे, शेअर्स व इतर यामध्ये सात कोटी ४५ लाख रु पयांची गुंतवणूक केली आहे. त्यांची आठ कोटी २४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. मुल्ला यांच्यावर ११ कोटींचे कर्ज आहे. मुल्ला यांनी आपण बांधकाम व्यावसायिक असून आपल्याकडे मर्सिडीजसह इतर महागड्या गाड्या असल्याचे जाहीर केले आहे. मुल्ला यांनी त्यांच्या नावे १६ कोटी ८९ लाख ३५ हजार आणि पत्नीच्या नावे सात कोटी ९८ लाख ९८९ रुपयांचे उत्पन्न असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.सेनेचे संजय मोरे यांच्यावरही नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात सार्वजनिक शांतताभंग करणे, लोकसेवकावर हल्ला करणे, अतिक्रमण करणे अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मोरे यांच्याकडे ७३ लाख रु पयांची जंगम, तर जवळपास एक कोटी ६४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर ५५ लाख रु पयांचे देणे आहे. आपला टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून पत्नी इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करते, अशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली.डावखरेंवर एकाही गुन्ह्याची नोंद नाहीभारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात एकही गुन्हा नोंद नसून कोणत्याही न्यायालयात एकही खटला सुरू नसल्याची माहिती दिली आहे.निरंजन यांनी ११ कोटी रुपयांची चल, तर सात कोटी ७९ लाख रु पयांची अचल संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्यावर जवळपास सातकोटी ३७ लाख रु पयांचे कर्ज आहे. निरंजन यांनी उत्पन्नाचा स्रोत भाडे, व्याज, वेतन दाखवले असून त्यांची पत्नी व्यावसायिक असल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे