शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर

By admin | Updated: January 25, 2016 14:17 IST

प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी कोल्हापूरात ९० हजार किलो जिलेबी फस्त होते

संदीप आडनाईक 
जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या ताटातील हा पदार्थ कधी लोकांच्या ताटात आला, ते कळलेच नाही. एरवी सणासुदीला, लग्नसमारंभात आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ ओळखला जातो तो मुलगी झाल्यानंतर आनंद साजरा करण्याचा पदार्थ म्हणून. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवसापासून खरेतर जिलेबी खाण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा माहोल काही आगळाच. खाण्याच्या बाबतीत आपले तोंड आणि हातही आखडता न घेणा:या कोल्हापुरकरांना खाण्यासाठी एखादे निमित्तच हवे असते. जिलेबी खाणोही याला अपवाद नाही. 
खरंतर, कोल्हापूर म्हटले, की आठवते तो तांबडा आणि पांढरा. परंतु आठवडय़ातून एकदा तरी यावर ताव मारणा-या कोल्हापुरातच स्वातंत्र्यदिन असो, की प्रजासत्ताक दिन, जिलेबी खाण्याचीही एक आगळीवेगळी परंपरा जपलेली आहे. कोल्हापुरात चौकाचौकात जिलेबीचे स्टॉल्स लागलेले असतात. मोजायचेच झाले तर त्यांची संख्या हजारावर जाते. पावशेर का होईना, जिलेबी घरात येतेच येते. मग तो कितीही गरीब असो, वा श्रीमंत. या आनंदाच्या प्रसंगी जिलेबी आवर्जून आणलीच जाते आणि आवडीने खाल्लीही जाते. कोल्हापुरकर सण असो वा नसो, रोज सहा हजार किलो जिलेबी फस्त करतात. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाला तर हा आकडा 90 हजार किलोच्या घरात जातो. कोल्हापुरात आजही जिलेबी तयार करणारी 100 च्या वर दुकाने आहेत.
 
 
किरकोळ विक्री करणारे 300 हून अधिक स्टॉल्सही असतात. केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी 90 हजार किलो जिलेबीची विक्री होत असते. शिवाय 80 लाखांची उलाढाल होत असते. 
कोल्हापुरात जिलेबी अशी उत्सवी उत्साहाने खाण्यापाठीमागे कारणही तसेच उत्सवी आहे. जिलेबी हा मोघलांचा खाद्यपदार्थ. पंचपक्वानामध्ये त्याचे स्थान. पण तेथून तो राजघराण्यातील व्यक्तींच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचला. 
 
जिलेबीचा इतिहास
 
कोल्हापुरात 88 वर्षापूर्वी जिलेबी आली असावी. कुस्तीशौकिन रामचंद्र बाबाजी माळकर यांनी सर्वप्रथम मल्लांनी कुस्ती मारली की त्यांचे तोंड गोड करण्यासाठी 88 वर्षापूर्वी जिलेबी वाटण्याची प्रथा सुरु केली, ती आजही कायम आहे. आज त्यांची चौथी पिढी म्हणजे निखिल मधुकर माळकर हे या व्यवसायात आहेत. इतकेच नव्हे तर पुण्यात आयटी क्षेत्रत नोकरी करणारे सागर माळकरही घरचा उद्योग असल्यामुळे घरच्यांना मदत म्हणून प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाला चार दिवस रजा काढून येत असतात. माळकरांची पाच भावंडेही याच व्यवसायात आहेत. माळकरांचे दुकान आज ज्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या चौकात आहे, त्यालाच माळकर तिकटी असे नाव आहे. महानगरपालिकेची इमारत नव्हती, त्या आधीपासून माळकरांचा वाडा आणि दुकान या परिसरात आहे. 
शाहू महाराजांच्यानंतर राजाराम महाराजांर्पयत शाही कार्यक्रमात, कुस्तीगीरांना वाटण्यासाठी, सणासुदीला जिलेबी वाटण्याची प्रथा कायम होती. शाहू महाराजांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जिलेबी वाटल्याचा संदर्भ सापडतो आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जिलेबीचा इतिहास हा तसा जुना आहे. राजाराम महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळय़ातही माळकरांकडून आणलेली जिलेबी वाटण्यात आल्याचे संदर्भ सापडले आहेत. राजघराण्यातही माळकर यांच्याकडून किती शेर जिलेबी आणली, याचे कागद सापडले आहेत. 
राजघराण्यातही महाराजांकडे रोज हजारभर रयत भोजनासाठी पंगतीला असे. त्यांच्यासाठी विविध खाद्यपदार्थ तयार केले जाते. शाहू महाराज मात्र, पंगतीला बसताना आपल्या सवंगडय़ाच्या हातातले पिठलेभाकर खात, अन त्यांच्यासाठी तयार केलेले जेवण पंगतीने इतरांना वाढले जात. समारंभात मात्र पंचपक्वाने बनत असत. त्यासाठी सोवळेकरी असंत. 
माळकरांबरोबरच चोपदार हॉटेलही जिलेबीसाठी प्रसिध्द. गणपतराव कृष्णराव भोसले हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी गावचे. त्यांनी शिवाजी पुतळय़ाजवळ हॉटेल टाकून तेथे जिलेबी देउ लागले. करवीरनगरी कुस्तीसाठी प्रसिध्द. त्यामुळे देशविदेशातील मल्ल येथे येत. शिवाजी पुतळय़ाजवळील चौक हा रहदारीचा. आजही आहे. तेथे गर्दी असायची. त्यामुळे पहिलवानांसाठी तेव्हा तुपातील जिलेबी, लोणी, कांदा भजी आणि चहा हे हॉटेल चोपदारचे पदार्थ अल्पावधीतच लोकप्रिय झाले.  या आठवणी आज नव्वदीत असलेले हारुण शेठ, आनंदराव सूर्यवंशी, शंकरराव काटे यांच्या स्मरणात आहेत. सादीक पंजाबी आणि गामा पंजाबी या पाकिस्तानी मल्लातील कुस्तीवेळी त्यांनी चोपदार हॉटेलमध्ये जिलेबी खाल्याची आठवण श्रीकांत चोपदार सांगतात.  माळकर, चोपदार यांच्याशिवाय पूर्वी उरुणकर, खत्री, ढिसाळ, विजय भुवन, सुखसागर, मिलन, आहार येथे जिलेबी मिळत असे. 
 
सातारकरांनीही सांभाळली परंपरा 
 
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी, क्रांतीवीरांच्या साता:यातील कृष्णा सीताराम राऊत यांनी त्यांना झालेला आनंद स्वत:पुरता ठेवला नाही. त्यांनी तब्बल 11 किलो जिलेबी सातारभर वाटली आणि हा आनंद साजरा केला. आजही ही परंपरा सातारकरांनी जपून ठेवली आहे. स्वातंत्र्यदिनी येथे परस्परांना जिलेबी देण्याची पद्धत आहे. ही अनोखी पद्धत साता:यात सुरू करण्याचे श्रेय कृष्णा राऊत यांनाच जाते. स्वातंत्र्यानंतर वाटलेली जिलेबी सातारकरांच्या लक्षात राहिली. पुढच्यावर्षी लोकांनी यंदा जिलेबी नाही का? अशी विचारणा केली. त्यावर्षीही राऊत यांनी जिलेबी वाटली आणि पुढे 69 वर्षे सातारकरांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे.
 
 
अशी बनते जिलेबी..
 
पूर्वी केवळ रिफाईन्ड तेलातील जिलेबी उपलब्ध होती. आता काळ बदललाय. वनस्पती आणि साजुक तुपातील जिलेबींना ग्राहक पसंती देत आहेत. असे असले तरी अजूनही रिफाईन्ड तेलातील जिलेबीला मोठी मागणी आहे. जिलेबीमध्ये पनीर जिलेबी, इमरती, डॉलर जिलेबी, केशर, दूध, वेलची जिलेबी व रसभर जिलेबी, मावा जिलेबी असे काही प्रकार आहेत. जिलेबी किंवा पाक तयार करताना लाकडाचा वापर केला तर त्याचा स्वाद अधिक खुलतो.  शुगर फ्री जिलेबीही मधुमेहींच्या रुग्णांसाठी मिळते. मात्र, त्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही जिलेबी साखरेच्या पाकात न टाकता ती शुगर फ्री सिरपमध्ये टाकली जाते. 
खंबीर लावणं :  जिलेबीचे पीठ साधारण एक आठवडा आधी भिजवले जाते. कोमट पाणी, दही आणि उच्च प्रतीचा मैदा असं एकत्न करून दह्याच्या मुरवणाप्रमाणो हे मित्नण भिजवून ठेवावे लागते. याला खंबीर लावणं असं म्हणतात. खंबीर उठणं आणि खंबीर बसणं यावर जिलेबीची चव आणि आकार अवलंबून असतो. खंबीर नीट जमलं नाही तर जिलेबी कडे धरत नाही किंवा साखरेचे पाणी शोषून घेत नाही. जिलेबी करताना 85 टक्के खंबीर आणि 15 टक्के मैदा एकत्न केले जाते. या मिश्रणाला पाणी न लागण्याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी डोळय़ात अक्षरश: तेल घालून बसावं लागतं.  जिलेबीचं पीठ जेवढं मुरतं तितकी छान चव जिलेबीला येते.
जिलेबी तळण्यासाठी पूर्वी पंढरपूरहून जिलेबीवाले येत. एकावेळी ते तीसभर जिलेबी गोलाकार तळत असतात. अलिकडे या पंढरपूरच्या कारागीरांची संख्या रोडावली असली तरी स्थानिक कामगार मात्र तयार झालेले आहेत. 
 
जिलेबीची कूळकथा
 
इसवी सनाच्या तिस:या शतकात पामिरन साम्राज्याचा राजा सेप्टिमियस ओडिनाथस याचा खून झाला. तो गेल्यानंतर त्याची दुसरी पत्नी ङोनोबिया हिच्या हाती सर्व सत्ता आली. तिने इजिप्तवर आक्रमण केले व पामिरन साम्राज्य वाढविले. लेबेनॉन, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, पॅलेस्टाईन, तुर्कस्थान हे देशही तिने स्वत:च्या अंमलाखाली आणले. नंतर ङोनोबियाने नवी शहरेही निर्माण केली. त्यापैकी जुळय़ा शहराचे नाव होते हलाबिया आणि झलाबिया. युफ्रेटिस नदीच्या काठावरील या शहरातच तिस:या किंवा चौथ्या शतकात जिलेबीचा जन्म झाला असावा. येथे एका हलवायाने मैद्याच्या आंबलेल्या पिठात अंडी घालून कुरकुरीत जाळीदार गोल बिस्किटे तळून तयार केली, आणि त्यात मध सोडला आणि या नव्या पदार्थालाच आपल्या शहराचे झलाबिया असे नाव दिले.हीच ती जिलेबी.
सीरियातून झलाबिया उत्तर आफ्रिका आणि आखातातील देशांत पोहोचली. सण आणि आनंदाच्या प्रसंगी ही झलाबिया खाण्यात येउ लागली. जसजसे या पदार्थाचे स्थलांतर होत गेले, तसतसे त्याचे रुपही बदलत गेले. या बिस्किटाला नंतर शामिय्या असे नाव मिळाले. शम्स हे सीरियाचे प्राचीन अरबी नाव. सीरियातून आलेला झलाबिया म्हणून तो झलाबिया शामिय्या. एका खानसाम्याने हे आंबलेले मैद्याचे पीठ तेलात तळले आणि मधात घोळले. या पदार्थाला त्याने झलाबिया मुशब्बक असे नाव दिले. यालाच आपण जिलेबी म्हणतो. 
या जिलेबीलाही जगभरात वेगवेगळय़ा नावाने ओळखले जाते. सीरियातीलच अल्पेपो या प्राचीन शहराचे हलब हे मूळ नाव, म्हणून सीरियात झलाबिया मुशब्बक, इराणमध्ये झुलबिया, टय़ुनिशिया व पॅलेस्टाईनमध्ये मुशब्बक हलब, बांगला देशात ङिालपी, भारत आणि पाकिस्तानात जलेबी किंवा जिलेबी असे नाव आहे. झलाबिया प्रथम भारतात आली ती महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तेथून तिचा प्रवास देशभर झाला. या देशांशिवाय तुर्कस्थान, ग्रीस, सायप्रस, टय़ुनिशिया, सीरिया, इराण, इराक, इजिप्त, येमेन, मोरोक्को येथेही सणासुदीला जिलेबी खातात. 
ऑक्सफर्ड कंपॅनियननुसार तेराव्या शतकातील अल बगदादीच्या पुस्तकात जिलेबी तयार करण्याची पध्दत असल्याचे म्हटले आहे. भारतीय वंशशास्त्रचे अभ्यासक पी. के. गोडे यांनी 1943 मध्ये लिहिलेल्या न्यू इंडियन अॅटीक्युरी या पुस्तकात जिलेबीची रेसिपी असल्याचे नोंदविले आहे. 1450 मध्ये लिहिलेल्या प्रियामकर्णरपकवा या जैन ग्रंथात तसेच 17व्या शतकातील रघुनाथ यांनी लिहिलेल्या भोजन कुटहला या ग्रंथातही जिलेबीचा संदर्भ आहे. 
 
 
(संदीप आडनाईक, लोकमत, कोल्हापूरमध्ये डेप्युटी चीफ सब एडिटर आहेत.)