शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

कोल्हापुरात मुंबईतील दोघे बुडाले

By admin | Updated: March 15, 2017 04:02 IST

वडणगे (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथील पंचगंगा नदीघाटावर पोहण्यास गेलेल्या मुंबईच्या दोघा तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथील पंचगंगा नदीघाटावर पोहण्यास गेलेल्या मुंबईच्या दोघा तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश बबन खोपकर (१८), मयूर सुरेश बनसोडे (१९, रा. दोघे म्हाडा कॉलनी, सायन, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. भाच्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या उमद्या तरुणांच्या मृत्यूमुळे वडणगे गाव शोकसागरात बुडाले. मयूर बनसोडे यांची बहीण वडणगे येथे आहे. भाच्याच्या वाढदिवसासाठी मयूर व त्याचे दोन मित्र गणेश खोपकर व अक्षय नथुराम गोळे (२१) असे तिघे मुंबईहून आले होते. गेल्या दोन दिवसांपासून ते वडणगे येथील पंचगंगा घाटावर अंघोळीसाठी जात होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास तिघे पोहण्यास गेले. तिघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने खोपकर व बनसोडे दोघेही बुडाले. ते बुडत असल्याचे दिसताच नदीकाठावर असलेल्या अक्षयने मोठ्याने आरडाओरड केली. यावेळी शेजारी असलेल्या लोकांनी घाटावर धाव घेतली. काही धाडसी तरुणांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले; परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)