शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बनतंय ‘हॉटेलिंग हब’

By admin | Updated: May 7, 2017 04:35 IST

कोल्हापूर : पुण्यानंतर मराठमोळ्या संस्कृतीचे शहर म्हणून कोल्हापूरचे नाव घेतले जाते. अंबाबाई, जोतिबा या धार्मिक

इंदुमती गणेश/ लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुण्यानंतर मराठमोळ्या संस्कृतीचे शहर म्हणून कोल्हापूरचे नाव घेतले जाते. अंबाबाई, जोतिबा या धार्मिक अधिष्ठानांसह ताराराणी, शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात रुचकर जेवण अल्प दरात मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर हे ‘हॉटेलिंग हब’ म्हणून पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख स्थान असलेल्या अंबाबाई मंदिरामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूरला भाविकांचा आणि पर्यायाने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. वर्षाला किमान ४० लाख भाविक कोल्हापुरात देवीच्या दर्शनासाठी येतात. कोल्हापूर शहरातील पर्यटन स्थळे पाहिल्यानंतर पर्यटकांची पावले वळतात, ती पोटपूजेसाठी. पर्यटनासाठी आपण अन्य कोणत्याही शहरात गेलो की बऱ्याचवेळा जेवणाची आबाळ होत असते. कोल्हापूर मात्र याला अपवाद आहे. अन्य वैशिष्ट्यांप्रमाणे तांबडा-पांढरा रस्सा, अस्सल खवय्यांचे आणि रुचकर जेवण मिळणारे शहर म्हणूनही कोल्हापूरची ख्याती आहे. केवळ अंबाबाई मंदिराच्या बाह्य आणि शहराच्या मध्यवर्ती परिसरात सातशे लहान-मोठी हॉटेल्स आहेत आणि त्यापेक्षा जास्त संख्येने घरगुती खानावळी आहेत. याशिवाय रंकाळा चौपाटी, केशवराव भोसले नाट्यगृहाजवळची खाऊगल्ली, राजारामपुरी अशा ठरावीक ठिकाणी जिभेचे चोचले पुरविणारे अनेक पदार्थ मिळतात. कोल्हापुरी नावाचे जगभरात ब्रँडिंग कोल्हापूरसह अन्य कोणत्याही शहरात जा. तेथील प्रत्येक हॉटेलमध्ये कोल्हापुरी नावाने चार-पाच डिशेस असतात. स्वतंत्र कोल्हापुरी खाद्यपदार्थांची यादी मेनूकार्डमध्ये असते. पनीर, काजू मसाला, कोफ्ता, रोटीसारख्या पंजाबी डिशेसना पर्यटकांकडून अधिक पसंती दिली जाते. वडापाव, मिसळ!जेवणाबरोबरच कोल्हापुरात नाष्ट्याचे पदार्थही तितकेच रुचकर बनवले जातात. वडापाव, झणझणीत मिसळ, कटवडा अशा अस्सल कोल्हापुरी खाद्यपदार्थांची चव जिभेवर रेंगाळते. दहा ते पंधरा रुपयांत पोहे, उपमा, आप्पे, इडली यांसारखे पदार्थ भरपेट खाता येतात. खानावळींमध्ये वेटिंग : पंचतारांकित हॉटेल्ससह अनेक मोठ्या हॉटेलमध्ये पर्यटकांची गर्दी असली तरी येथील पेठांमध्ये आणि गल्लीबोळांमध्ये असलेल्या खानावळींनी तांबड्या-पांढऱ्या रश्शासह जेवणाचे विविध प्रकार जगभर पोहोचविले आहेत. एकट्या मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या परिसरात सव्वाशेहून अधिक घरगुती खानावळी आहेत. खास या खानावळींमध्ये जेवण्यासाठी पुण्यासारख्या शहरातून लोक येतात. चुलीवरचे पिठले, भाकरी व मिरचीचा ठेचा आहेच. इथे आलेला पर्यटक कधीच जेवण चांगले नाही म्हणून अर्धपोटी जात नाही. त्यामुळेच देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेला पर्यटक खाद्यभ्रमंती करूनच येथून तृप्त मनाने बाहेर पडतो. त्यामुळे कोल्हापूरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील विकास आराखड्यात या खाद्यसंस्कृती आणि हॉटेलिंग हबच्या दृष्टीनेही पावले उचलावी लागणार आहेत. कोल्हापूरची खाद्यसंस्कृती पूर्वीपासूनच चांगली आहे. नाष्टा, जेवणाच्या पदार्थांचे असंख्य प्रकार, अल्प दर आणि वाढत्या पर्यटनामुळे ती जगभर पोहोचले आहेत. घरगुती खानावळींचाही मोलाचा वाटा आहे. शहरविकासाच्या दृष्टीने रेल्वे स्थानक, बस स्थानक अशा परिसरात ‘फूड कोर्ट’सारखी संकल्पना राबविण्यात यावी. - उज्ज्वल नागेशकर (हॉटेल व्यवसायिक)