पनवेल : मडगाववरून मुंबईला कोकण कन्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या चंदन रेवणकर या सोने व्यापाऱ्याला पनवेल रेल्वे स्थानकाजवळ तीन चोरांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटले. ही घटना मंगळवारी पहाटे ४.१५ला घडली. यावेळी २ किलो ९८ ग्राम सोने चोरट्यांनी लंपास केले. चंदन रेवणकर व त्याचा साथीदार सोने मुंबईत पोहोचवण्यासाठी कारवारहून निघाले होते. ते मडगाववरून कोकण कन्या ट्रेनने प्रवास करत असताना पनवेल रेल्वे स्थानकावर तीन चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत धक्काबुक्की केली. गाडी पुढे सरकताच गाडीतून उडी घेऊन पळ काढला. घटनेची नोंद पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कारभारीकर हे करत आहेत. (प्रतिनिधी)
कोकेण रेल्वेत सोने व्यापाऱ्याला लुटले
By admin | Updated: August 5, 2015 01:07 IST