शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Andhare: ५१ रुपये घेऊन सोडले घर! शिवसेनेच्या रणरागिणी सुषमा अंधारेंचे शिक्षण किती? संघर्षातून घडले नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 10:17 IST

Sushma Andhare: खडतर आणि संघर्षमय आयुष्य जगत वक्तृत्व स्पर्धांमधील बक्षिसातून सुषमा अंधारे यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले. उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. मात्र, कमी कालावधीत शिवसेनेच्या धडाडीच्या रणरागिणी बनलेल्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर अनेकदा तुटून पडल्याचे दिसून आले. मात्र, सुषमा अंधारे यांचे आयुष्य अत्यंत खडतर आणि संघर्षाचे राहिलेले आहे. सुषमा अंधारे यांचे शिक्षण किती आहे? जाणून घेऊया...

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून सुषमा अंधारे यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. सुषमा अंधारे या शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाने आपल्या भाषणाने शिवसैनिकांमधील जोश, उत्साह कायम ठेवला आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि कायद्याचा व्यासंग सुषमा अंधारे यांना आहे. सुषमा अंधारे यांनी पाहिलेली गरिबी,  समाजव्यवस्था, त्यांचा चळवळीतील अनुभव हे त्यांच्या प्रभावशाली भाषणामागचे गमक असल्याचे बोलले जाते. 

वक्तृत्व स्पर्धातील बक्षिसातून शिक्षण पूर्ण

सुषमा अंधारे यांनी शिक्षण घेण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी त्यांना ५१ रुपये बक्षिस म्हणून दिले होते. ही रक्कम घेऊन त्या लातूरला शिक्षण घेण्यासाठी निघून गेल्या. वक्तृत्व स्पर्धातून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लातूर जिल्ह्यातील मुरुड हे सुषमा अंधारे यांचे मूळ गाव आहे. येथे त्यांनी बारावीपर्यंत शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बसवेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. येथे त्यांनी राज्यशास्त्रामध्ये एमए केले. पुढे उमरगा येथे त्यांनी बीएड केले. हे सर्व सुरु असताना त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असत.

दरम्यान, सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त समाजातून येतात. सुषमा अंधारे या शिवसेनेत येण्याआधी गणराज्य संघच्या माध्यमातून काम करत होत्या. सुषमा अंधारे यांचे आजोबा कबीरपंथी होते. म्हणून सुषमा यांनी त्यांच्या मुलीचे नाव कबीरा असे ठेवले. सुषमा यांना लहानपणी रुबाब म्हटले जायचे, असे सांगितले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv Senaशिवसेना