शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचा लाँग मार्च स्थगित; गिरीश महाजनांची यशस्वी शिष्टाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:10 IST

सरकारच्या लेखी आश्वासनानंतर लाँग मार्च स्थगित

नाशिक: नाशिकमधून निघालेला किसान सभेचा लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलकांशी चर्चा केली. तब्बल पाच तास ही चर्चा सुरू होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महाजन यांनी दिली. यानंतर लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार जे. पी. गावित यांनी यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली.आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिकहून लाँग मार्चला सुरुवात केली. हा मोर्चा 27 तारखेला मुंबईत धडकणार होता. मात्र गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीनं आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्या मान्य असल्याचं लेखी आश्वासन त्यांनी दिलं. वन हक्क जमिनीचे दावे लवकरात लवकर निकाली काढा, अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती. त्यांना सरकारकडून 3 महिन्यात दावे निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं. यानंतर किसान सभेनं मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा यशस्वी झाली. सातबारा कोरा, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदिवासी लाँग मार्च करत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकूच करत निघाले होते.