शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sainiks attack Kirit Somaiya Video: मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला; चेहऱ्यावरून रक्त ओघळू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 23:04 IST

Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या.

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला. सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्या फेकत घोषणाबाजी केली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांच्या तोंडाला दुखापत झाली असून त्यांच्या हनुवटीवरून रक्त येत होते. 

राणा दाम्पत्याला सांगितल्या प्रमाणे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी खारच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. यावर राणांच्या आजच्या या कारस्थानाला भाजपाचा पाठिंबा होता हे सिद्ध झाल्याचा आरोप माजी महापौर महाडेश्वर यांनी केला आहे. दरम्यान किरीट सोमय्या पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी किरीट सोमय्या मधल्या सीटवर बसले होते, तेव्हा त्यांच्या काचेवर दगड भिरकावण्यात आला. यामुळे सोमय्या यांच्या तोंडाला दुखापत झाली आहे. किरीट सोमय्या जखमी अवस्थेत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत.

 

सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या. सोमय्या यांच्या चालकाने अंगावर  गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप  शिवसैनिकांनी केला आहे. 

तिथे उपस्थित असलेले माजी महापौर महाडेश्वर यांनी आता खरे काय सुरु होते हे समोर आले आहे. भाजपाचा राणांच्या या कारस्थानामागे हात होता. त्यांचा नेता इथे आल्याने ते आता जनतेसमोर आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, रवी राणांनी जामिन घेण्यास नकार दिला. आपल्याला बेकायदेशीर अटक करण्यात आल्याचे ते म्हणाले. 

तत्पूर्वी, रवी राणा यांनी खार पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केली आहे. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी रवी राणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर शिवसेनेच्या चार जिल्हाप्रमुखांनी राणा दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान राणा यांच्या वक्तव्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. राणा यांनी लोकांना मुंबईत बोलविण्याचा व्हिडीओ शोधत आहेत.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाMumbai policeमुंबई पोलीस