शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

एक हजार कोटींच्या ‘मॅग्नेट’योजनेत फळांच्या ‘राजा’ला स्थान नाही; दहा पिकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 2:24 AM

राज्यात सहा वर्षांसाठी सुमारे १४२.९ दशलक्ष डॉलर अर्थात एक हजार कोटी रुपये खर्चून ‘मॅग्नेट’ योजना राबविण्यात येणार असून यासाठी एडीबीकडून सातशे कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे.

नारायण जाधव ठाणे : कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक हजार कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क अर्थात ‘मॅग्नेट’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात दहा पिकांचा समावेश केला. यासाठी एडीबी अर्थात आशियाई विकास बँकेकडून सातशे कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या योजनेतून फळांचा राजा असलेल्या आंबा पिकाला वगळले आहे. याचा मोठा फटका कोकणातील हापूस उत्पादक आणि त्यावर प्रक्रिया करणाºया उद्योगांना बसणार आहे.

शासकीय योजना व प्रकल्पांच्या माध्यमातून संघटित केलेल्या शेतकऱ्यांना व आवश्यकतेनुसार नवीन शेतकरी उत्पादक संस्था स्थापनकरून त्याद्वारे कृषीमालावर प्रक्रिया करून तो थेट ग्राहक, उद्योजक, निर्यातदारांना पुरविण्यासाठी महाराष्ट्राच्या सहकार व पणन मंत्रालयाने ‘मॅग्नेट’ची स्थापना केली असून नीती आयोगाने त्याचा कृतीआराखडा मंजूर करून एडीबीकडून १०० दशलक्ष डॉलर कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे.या दहा पिकांचा आहे समावेश‘मॅग्नेट’ योजनेत राज्यातील डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल) या दहा फलोत्पादनांचा समावेश केला आहे. भविष्यात यात काही फुलोत्पादनांचाही समावेश करण्यात येणार आहे. यात खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करून काढणी पश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वाहतूक व साठवण क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. परंतु, या दहा पिकांमध्ये आंब्याला स्थान दिलेले नाही. राज्यात कोकणसह जुन्नर आणि मराठवाड्यातमोठ्या प्रमाणात आंब्याचे पीक घेतले जाते. यामुळे शेतकºयांत नाराजी आहे.एडीबीकडून सातशे कोटींचे कर्ज घेणारराज्यात सहा वर्षांसाठी सुमारे १४२.९ दशलक्ष डॉलर अर्थात एक हजार कोटी रुपये खर्चून ‘मॅग्नेट’ योजना राबविण्यात येणार असून यासाठी एडीबीकडून सातशे कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे. तर ३० टक्के निधी राज्य शासन स्वत: उभारणार आहे. कर्जासाठी वित्त मंत्रालय आणि एडीबीसोबत वाटाघाटींसाठी पणन सचिवांना प्राधिकृत केले असून ‘मॅग्नेट’ योजनेवर मुख्य सचिवांचे नियंत्रण राहणार आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारagricultureशेती