विदर्भातील किडनीचे रुग्ण अडचणीत

By admin | Published: January 9, 2015 12:45 AM2015-01-09T00:45:07+5:302015-01-09T00:45:07+5:30

मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या केवळ चार डायलिसिस मशीन्सवर विदर्भासह शेजारच्या राज्यातील रुग्णांचा भार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील नऊ पैकी पाच

Kidney sufferers in Vidarbha face trouble | विदर्भातील किडनीचे रुग्ण अडचणीत

विदर्भातील किडनीचे रुग्ण अडचणीत

Next

सुपर स्पेशालिटी रुग्णालय : नऊपैकी पाच डायलिसिस मशीन्स बंद
नागपूर : मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या केवळ चार डायलिसिस मशीन्सवर विदर्भासह शेजारच्या राज्यातील रुग्णांचा भार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील नऊ पैकी पाच मशीन्स बंद पडल्या आहेत. परिणामी या गंभीर व खर्चिक आजाराशी झगडत असणाऱ्या रुग्णांना पदरमोड करून खासगी रु ग्णालयातून उपचार घेण्याची वेळ आली आहे.
दोन्ही मूत्रपिंड कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात निकामी झालेल्या रु ग्णाला डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. विदर्भात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध आहे. परंतु सुपरमधील डायलिसिस विभागातील नऊ पैकी पाच मशीन बंद पडल्या आहेत. केवळ चार मशीनवर विभाग सुरू आहे. मागील वर्षभरापासून याच मशीनवर रुग्णांचा भार वाढल्याने रु ग्णांवर दीर्घ प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक रु ग्णांचे आठवड्यातून दोन तरी दिवस हिमो डायलिसिस करावे लागते. विशेषत: गंभीर रु ग्णांना हिमो डायलिसिसशिवाय पर्याय नसतो. खासगी रु ग्णालयात प्रत्येक हिमो डायलिसिसला हजार ते दीड हजार रु पये लागतात आणि गोरगरिब रु ग्णांना ते परवड नाही. त्यामुळेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डायलिसिससाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. रुग्णांची वाढती संख्या व तत्काळ नव्या डायलिसिस मशीनच्या खरेदीकडे अद्यापही कुणाचेच लक्ष नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
फक्त दहाच जणांचे डायलिसिस
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नेफ्रालॉजीच्या बाह्यरुग्ण विभागात रोज शंभरावर रुग्ण उपचारासाठी येतात. यातील १५-२० रुग्णांना हिमोडायलिसिसची गरज असते. परंतु चारच मशीन सुरू असल्याने यातील दहाच रुग्णांचे डायलिसिस होते. इतर रुग्णांना प्रतीक्षा यादीत टाकले जाते. दिवसेंदिवस अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांचे आजार वाढून गंभीर स्थिती उद्भवत आहे. (प्रतिनिधी)
किडनी निकामी होण्याचे वाढतेय प्रमाण
बदलत्या जीवनशैलीमुळे मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. किडनी निकामी होण्याचे युवकांमधील प्रमाण गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. पाण्यातील अतिरिक्त क्षार, आहारात वापरण्यात येणारे तेल, स्निग्ध पदार्थांचा वाढता वापर, जंकफूडचा सातत्याने होणारा मारा यांच्या एकत्रित परिणामही याला कारणीभूत आहे. वेगवेगळ्या आजारांसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचे दुष्परिणामही किडनी निकामी होण्यावर होतात.
-तर डायलिसीस बंद
डायलिसीस करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेली आरो मशीन आज गुरुवारी दुपारनंतर अचानक बंद पडली. सायंकाळपर्यंत ही मशीन दुरुस्त करण्यासाठी विशेष हालचाली झाल्या नाहीत. परिणामी उद्या शुक्रवारी डायलिसीस प्रक्रिया बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Kidney sufferers in Vidarbha face trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.