शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खेरवाडी पुलाची मार्गिका खुली

By admin | Updated: April 20, 2015 02:47 IST

गेले काही दिवस वाहतूक कोंडीचे कारण बनलेल्या खेरवाडी उड्डाणपुलाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : गेले काही दिवस वाहतूक कोंडीचे कारण बनलेल्या खेरवाडी उड्डाणपुलाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाला असून, ५८० मीटरच्या या पुलाचे काम अवघ्या सहा महिन्यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ वेळेत पूर्ण करण्यात आल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) हे सातत्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये व्यस्त असते; हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे असून, या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र उभारण्यासाठी आयकॉनिक इमारत बांधण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला केली.फडणवीस म्हणाले, मुंबई शहरातील दळणवळणाला योग्य वेग मिळाल्यानंतर शहराची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. ५८० मीटर लांबीच्या खेरवाडी उड्डाणपुलासह १.६ किलोमीटर लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुलास पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा उन्नत मार्ग; या दोन्ही प्रकल्पांमुळे वांद्रे-कुर्ला संकुलास मोठा फायदा होणार आहे. मोनो रेल्वेच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या अहवालाचा खोलात जाऊन अभ्यास करण्यात येईल.