शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नाशिक विभागात बदलला खरीप पॅटर्न

By admin | Updated: September 26, 2016 23:22 IST

बदलत्या पर्जन्यमानाने विभागातील खरिपाच्या पीकपेरणी पॅटर्नही बदलू लागला असून, कधी काळी लाखो हेक्टरच्या घरात लागवड असलेली खरिपाची बाजरी नाशिकमधून हंगामागणिक कमी होत आहे

गणेश धुरी

नाशिक, दि. २६ : बदलत्या पर्जन्यमानाने विभागातील खरिपाच्या पीकपेरणी पॅटर्नही बदलू लागला असून, कधी काळी लाखो हेक्टरच्या घरात लागवड असलेली खरिपाची बाजरी नाशिकमधून हंगामागणिक कमी होत आहे. त्यामानाने विभागात सर्वत्र मका आणि सोयाबीनच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. सोयाबीनची लागवड नाशिकला क्षेत्राच्या ११७ टक्के, धुळ्याला १८३ टक्के, नंदुरबारला २७९ टक्के, तर जळगावमध्ये १८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. तसेच नाशिकला मका ११७ टक्के क्षेत्रावर, धुळे - ९५ टक्के, नंदुरबार - १३४ टक्के आणि जळगावला १३१ टक्के क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे. दोन वर्षांपासून सातत्याने घटलेले पर्जन्य, यावर्षी दमदार हजेरी असणाऱ्या पर्जन्यामुळे हा खरिपाचा पीकपॅटर्न बदलल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला जात आहे. मात्र तरी त्यामागील नगदी पिके घेऊन कमी काळात झटपट पैसा वसूल करण्याच्या भूमिकेतून हा खरिपाचा पीकपॅटर्न बदलल्याची चर्चा आहे.

नाशिकला खरिपाच्या बाजरीवर संकटनाशिक जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५२ हजार ५०० हेक्टर असून, यावर्षी पाऊस दमदार झाल्याने पेरण्याही शंभर टक्के झाल्या आहेत. असे असले तरी खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र कमी पर्जन्यामुळे सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी दोन लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अवघ्या एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावरच बाजरीची लागवड झाली होती. यावर्षी त्यामुळेच सरासरी लागवडीखालील क्षेत्र अचानक घटून ते एक लाख ६० हजार हेक्टर होते. त्यापैकीही १ लाख ३१ हजार ८२२ हेक्टरवरच बाजरीची लागवड करण्यात आली आहे. म्हणजेच दोन वर्षांत दोन लाखांवरून खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र घटून अवघे सव्वा लाख इतकेच झाले आहे. खरिपाचे यावर्षीचे पीकनिहाय सरासरी क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे, कंसात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - भात - ६६,७०० (७७८१३), ज्वारी - ३९०० (५७१), बाजरी-१,६०,२०० (१,३१,८२२), नागली - ३५३०० (२८३०५), मका - १,७३,००० (२,१८,२७३), इतर तृणधान्य - १३६०० (१४७०५), तूर -१०४०० (१०७५४), मूग - १०३०० (१२३४२), उडीद - १४७०० (११२८८), इतर कडधान्य -१०००० (६२२७), भूईमूग - ३१३०० (२५९११), सूर्यफूल - १०० (२४), तीळ -०.७५ (९२), सोेयाबीन - ५७००० (६४६९९), खुरसणी - १५१०० (८२५४), इतरगळीत - ३००० (५९१), कापूस - ४७२०० (४०७८०) असे एकूण सहा लाख ५२, ५०० हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाख ५१,८२१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

धुळे - नंदुरबारला ज्वारी कायम४ धुळे व नंदुरबार जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र घटलेले नाही. उलट नंदुरबारला ते १२४ टक्के पेरणी क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. धुळे जिल्ह्यात खरीप बाजरीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र दोन लाख १२ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख हेक्टरवर खरीप बाजरीची लागवड करण्यात आली आहे. नंदुरबारला खरीप बाजरीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र २७ हजार ८०० हेक्टरचे असताना प्रत्यक्षात ३४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरी खरीप ज्वारीची लागवड झाली आहे. जळगावला मात्र तुलनेने खरीप ज्वारीचे क्षेत्र काहीसे घटले आहे. जळगावमध्ये खरिपाच्या बाजरीचे लागवडीखालील क्षेत्र ८० हजार १०० हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ ५२ हजार २०० हेक्टर (६५ टक्के) क्षेत्रावर खरीप ज्वारीची लागवड करण्यात आली आहे.

मका- सोयाबीनचे वाढते क्षेत्र धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात खरीप मक्याचे क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्यात खरीप मक्याचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६६ हजार ४०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ६३ हजार हेक्टरवर खरीप मक्याची लागवड करण्यात आली आहे. नंदुरबारला खरीप मक्याचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र २९ हजार २०० हेक्टरचे असताना प्रत्यक्षात ३९ हजार ३०० हेक्टर (१३४ टक्के) क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. जळगावला खरीप मका पिकाचे क्षेत्र काहीसे वाढले आहे. जळगावमध्ये खरिपाच्या मक्याचे लागवडीखालील क्षेत्र ७५ हजार १०० हेक्टर असताना प्रत्यक्षात मका पिकाची लागवड ९८ हजार ६०० हेक्टर (१३१ टक्के) क्षेत्रावर खरीप मक्याची लगवड करण्यात आली आहे. सोयाबीन पिकाचा विचार केला, तर धुळे जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र १४ हजार १०० हेक्टर असताना प्रत्यक्षात सोयाबीनची लागवड १८ हजार ३०० हेक्टर ( १२९ टक्के) क्षेत्रावर करण्यात आलेली आहे. जळगावला सोयाबीन लागवडीचे सरासरी क्षेत्र १६ हजार ८०० हेक्टर असताना प्रत्यक्षात सोयाबीनची लागवड ३० हजार ४०० हेक्टर (१८० टक्के) क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. त्या तुलनेत नंदुरबारला मात्र सोयाबीन पिकाची लागवड सरासरी क्षेत्राच्या कमी प्रमाणावर झाली आहे. सोयाबीनचे लागवडीखालील क्षेत्र २९ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात २७ हजार ९०० हेक्टर क्षेत्राावर सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे.मागील वर्षी होते

दुबार पेरणीचे संकटसाधारणत: जूनमध्येच नियमित हजेरी लावणाऱ्या मान्सूनने मागील वर्षी जुलै उजाडला तरी दडी मारल्याने नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रमुख पिकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. नाशिकला पाऊस लांबल्याने खरिपात लागवड केलेली भात व नागलीचे रोपे जळाल्याने मागील वर्षी काही भागात भात व नागलीची दुबार पेरणी करावी लागली होती. त्यातही तूर आणि भूईमूग पिके खरिपात लवकर पेरणी होत असल्याने ही पिके जळून गेल्याचे चित्र होते. मात्र या वर्षी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस झाल्याने शंभर टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या हंगामात दमदार पाऊस झाल्याने केवळ भातच नव्हे तर नागली, वरई, तूर, मूग, उडीद या क्षेत्रांच्या उद्दिष्ट असलेल्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.