शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

खरिपाचे अनुदान मुख्यमंत्री निधीलाच दान!

By admin | Updated: September 10, 2015 02:42 IST

शासनाने खरीप हंगामासाठी देऊ केलेले मागच्या वर्षीचे अनुदान यावर्षीचा हंगाम गेल्यानंतरही पदरी पडलेले नाही. यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

- विकास राऊत,  औरंगाबादशासनाने खरीप हंगामासाठी देऊ केलेले मागच्या वर्षीचे अनुदान यावर्षीचा हंगाम गेल्यानंतरही पदरी पडलेले नाही. यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने हे देऊ केलेले अनुदान मुख्यमंत्री निधीलाच दान दिले आहे.शिरेगाव येथील आप्पासाहेब कऱ्हाळे असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. मे महिन्यापासून साडेचार हजार रुपयांसाठी ते तहसील कार्यालयात खेटा घालत होते. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी ते रिकाम्या हाताने परतले. आजारपण आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या पिळवणुकीमुळे थकलेले कऱ्हाळे यांनी १३ आॅगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला. आता हे अनुदान कऱ्हाळे यांना देण्यासाठी गंगापूर तहसीलने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. पतीच्या निधनानंतर प्रशासनाने देऊ केलेले दुष्काळी अनुदान अप्पासाहेब यांच्या पत्नी मंदाबाई कऱ्हाळे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दान करण्याचा अर्ज गंगापूरचे तहसीलदार दिनेश झांपले यांना दिला आहे. पती हयात असताना अनुदान मिळाले नाही. मग त्यांच्या पश्चात ते अनुदान काय करायचे असा सवाल मंदाबाई यांनी अर्जातून केला आहे.मे महिन्यात दिले होते पत्र...कऱ्हाळे यांनी मेमध्ये गंगापूर तहसीलदारांना अनुदान बँक खात्यात जमा होत नसल्याबाबत निवेदन दिले होते. त्यावरून आयसीआयसीआय या बँकेला नोटीस काढून तहसीलदाराने अनुदान तातडीने वाटप करण्यास सांगितले. त्यानंतर साडेतीन महिने उलटले. मात्र कऱ्हाळे यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नव्हते. बँकेला जानेवारीमध्ये अनुदानाची रक्कम देण्यात आली होती; परंतु यादीमध्ये कऱ्हाळे यांचे नाव नसल्यामुळे अनुदान जमा झाले नसल्याचे बँकेने तहसीलदारांना कळविले होते.या प्रकरणाची माहिती घेतली आहे. तलाठी आर. बी. वंजारे यांच्या अहवालात संबंधित शेतकऱ्याचे नाव आले नाही. त्यामुळे अनुदान देण्यात विलंब झाला. याप्रकरणी तलाठ्याला नोटीस बजावली आहे. - दिनेश झांपले, तहसीलदार, गंगापूरअनुदानाच्या पहिल्या मंजूर यादीत नाव होते. दुसऱ्या यादीत नाव नव्हते. वडील गेल्यामुळे ते अनुदान आता मुख्यमंत्री निधीसाठी देऊ केले आहे. परंतु ती रक्कम सहायता निधीत सामावून घेण्याचा निर्णय तहसील कार्यालय घेत नाही.- दत्ता कऱ्हाळे, आप्पासाहेब यांचा मुलगा