शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजनांच्या नेतृत्वात काम करण्यास खडसे तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 06:09 IST

युतीसाठी भाजपा हतबल का?; खडसे यांचा सवाल

जळगाव : सध्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. मी नेता नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी तयार आहे. मात्र हे करीत असताना वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.महापालिका निवडणुकीबाबत शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी निवासस्थानी पत्रकारांसोबत वार्तालाप केला. ते म्हणाले की, निवडणुकीत भाजपा व खान्देश विकास आघाडी (खाविआ) यांच्या युतीबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. जळगावात कोणतेही पाठबळ नसताना यापूर्वी आपण ३३ नगरसेवक निवडून आणले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयी केला आहे. त्यावेळी फक्त एकट्या नाथाभाऊने जळगावात पक्ष वाढविला. निवडणुका सुरू होऊ द्या. माझ्या हातात भरपूर काही आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या...’, असेही खडसे म्हणाले.भाजपा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत आहे. आमच्याकडे मंत्री आहेत. पक्षाची ताकद आहे. मात्र तरी देखील भाजपा खाविआसोबत युती करण्यासाठी का तयार होत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला.अंजली दमानिया यांच्या विरोधात दाखल खटल्याचा तपास पुन्हा पोलीस निरीक्षक कडलक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांचे वर्तन हे नियमबाह्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी या मागणीचा अर्ज आपण औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्याचे खडसे यांनी सांगितले.