शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

खार पोलिसांची आरोपीला मदत

By admin | Updated: January 23, 2017 04:12 IST

एका गारमेंटच्या दुकानाचा बळजबरीने कब्जा घेऊन त्यातील सुमारे ७ कोटींच्या साहित्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जमीर काझी / मुंबईएका गारमेंटच्या दुकानाचा बळजबरीने कब्जा घेऊन त्यातील सुमारे ७ कोटींच्या साहित्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी खार पोलिसांनी संशयित आरोपींना तब्बल ५ महिन्यांपासून पूर्ण मोकळीक दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकरणातील संशयित हे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेल्याने काहीही कार्यवाही केलेली नाही, अशी चक्क कबुली माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जावर दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धुडकावून तपास अधिकारी संशयिताला मदत करीत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर सहायक आयुक्त व पोलीस उपायुक्तांनीही या प्रकरणातील गांभीर्य समजून न घेता तपास अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याने पोलीस आयुक्त डी. डी. पडसलगीकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात येत आहे.चेंबूर येथील रमेश पटेल यांचे खार पश्चिम येथील एस. व्ही. रोडवर कृष्णा वर्ल्ड फॅशन या नावाचे रेडिमेड गारमेंटचे दुकान आहे. पटेल यांची जोगेश्वरीतील सदाशिव पांडे याच्याशी अडीच वर्षांपासून ओळख आहे. व्यवसायासाठी त्यांनी फेबु्रवारी २०१३मध्ये ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ३५ कोटी ४० लाख मुद्दल व २ लाख ८० हजार परत केले. मात्र उर्वरित रक्कम वेळेत न दिल्याने त्यांच्यात वाद झाले. पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पटेल व त्याचे ३ भाऊ व कामगारांसह १० जणांनी आपल्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप करीत २६ आॅक्टोबर २०१३ रोजी खार पोलिसांकडून अटक करविली. ते आॅर्थर रोड जेलमध्ये असताना त्यांच्या रेडिमेंट दुकानाचा बळजबरीने ताबा घेतला. त्याबाबत खार पोलिसांनी स्वतंत्रपणे पटेल यांच्या तक्रारीनुसार पांडे व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही दिवसांनी पटेल यांना त्यांच्या दुकानातील सर्व फर्निचर, तयार कपडे व अन्य ऐवज असा सुमारे ७ कोटी रुपयांचे साहित्य पांडे यांनी गायब केल्याचे समजल्यानंतर त्याबाबत त्यांनी १४ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यासाठी खार पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ आश्वासनावर बोळवण केली. अखेर पटेल यांनी याबाबत पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीबाबत आरटीआय अंतर्गंत गेल्या वर्षी २७ नोव्हेंबरला माहिती विचारली असता, तपास अधिकारी सहायक निरीक्षक नीलेश भुजबळ यांच्या अहवालानुसार वांद्रे विभागाचे सहायक आयुक्त संजय कदम यांनी चक्क कळविले की, सदर तक्रारीबाबत पाडे व त्यांचे सहकारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेलेले आहेत. त्यामुळे काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दखलपात्र गुन्हा त्वरित दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिलेले आहेत. मात्र या ठिकाणी तब्बल ४ महिने काहीच कार्यवाही न झाल्याने पटेल यांनी या उत्तराबाबत प्रथम अपील अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यानुसार परिमंडळ-९चे उपायुक्त सत्यनारायण यांच्याकडे २७ डिसेंबरला सुनावणी झाली. त्यांनी चौकशी करण्याचे तोंडी आश्वासन दिले तरी प्रत्यक्षात या प्रकरणी जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेली माहिती योग्य असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवत पोलिसांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.