शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वाढदिवसानिमित्त आमदाराची ‘खड्डे भेट’

By admin | Updated: July 22, 2016 05:39 IST

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सध्या टीकेची झोड उठलेली आहे.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सध्या टीकेची झोड उठलेली आहे. त्यात शिवसेना आमदाराच्या वाढदिवसानिमित्त पूर्व उपनगरातील रस्त्यांवर खड्डे खणून बॅनर उभारण्यात आले आहेत. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण असताना या आमदाराने वाढदिवसानिमित्त मुंबईकरांना खड्ड्यांची भेट दिल्याची चर्चा सध्या पूर्व उपनगरांत रंगलेली आहे.भांडुप पूर्व-विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांचा वाढदिवस बुधवारी, २० जुलै रोजी साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे मोठ-मोठे बॅनर पूर्व उपनगरातील मुलुंड ते घाटकोपर, तसेच पवईपर्यंत उभारण्यात आले. बॅनर लावताना त्याचे खांब उभे करण्यासाठी खड्डे खणण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, विक्रोळी कन्नमवार परिसरात लागलेल्या बॅनरखाली आधीच रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यातच खड्डे खणून बॅनर उभे केले आहेत. हे खड्डे एका बाजूला असले, तरी बॅनर काढल्यानंतर हे खड्डे पादचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने शहरातील बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी धोरण आखले आहे. त्यात राजकीय पक्ष आणि व्यावसायिक संस्थांना बॅनर लावण्यास मनाई करण्यात आली. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, मेळावे व अधिवेशनासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी १० बाय १० चौरस फुटांचे फक्त दोनच फलक लावण्याची परवानगी देण्यात आली, तसेच गणेशोत्सव, नवरात्रौत्सवादरम्यान रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खणण्यास पालिका प्रशासन मनाई करते. असे असतानाही शिवसेनेतील वजनदार नेत्याचा भाऊ असलेल्या या आमदारासाठी, पालिकेचे नियम पायदळी तुडवून वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत आहेत. याबाबत पालिका पूर्व उपनगरचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्क होऊ शकला नाही.वाढदिवसाला गँगस्टरची हजेरीनुकताच कांजूरमार्ग येथील कंत्राटदाराला मारहाण करून खंडणी मागितल्याप्रकरणी, जामिनावर बाहेर आलेला कुमार पिल्लई गँगचा गँगस्टर मयूर शिंदेने राऊतांच्या वाढदिवसाला हजेरी लावली. एकीकडे शिंदेशी आपला काहीही संबंध नाही म्हणणारे आमदारांच्या पार्टीत मात्र, तो त्यांच्या शेजारी उभा असलेला दिसून आला. शिंदे यानेही आमदारांसाठी शुभेच्छा फलक भांडुपमध्ये लावले आहेत.>खड्डे खणून बॅनर लावल्याचा इन्काररस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. माझ्या वाढदिवसानिमित कोठेही खड्डे खणून बॅनर लावण्यात आलेले नाहीत. विक्रोळी जनता मार्केट परिसरात ज्या बॅनरचा उल्लेख आपण करत आहात, तो माझ्या विभागातील नाही, शिवाय त्यासाठीही खड्डा खणला असेल, असे मला वाटत नाही. - सुनील राऊत, आमदार, शिवसेना