जळगाव : महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न सारखे पाहत आहेत. मात्र ते बहुजनांचे नेते असल्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक संतोष भेगडे यांनी येथे केली. खडसे यांना भाजपात महत्त्वाचे स्थान नाही. त्यांनी अनेक चुका केल्या आहेत. निवडणुकीवेळी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले. सत्ता आली तर एका महिन्यात त्यांना जेलमध्ये टाकू, अशा वल्गना केल्या. आज सत्ता मिळून नऊ महिने उलटले तरीही त्यांना आरोप सिद्ध करणे शक्य झालेले नाही, असे भेगडे म्हणाले. (प्रतिनिधी)
‘खडसेंचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही’
By admin | Updated: June 29, 2015 01:57 IST