शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ने घटला केरोसिनचा कोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 03:25 IST

राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांशी आधार कार्ड जोडण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर, एकट्या पुणे विभागातून गेल्या वर्षभरात

पुणे : राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांशी आधार कार्ड जोडण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर, एकट्या पुणे विभागातून गेल्या वर्षभरात तब्बल दोन हजार ३०३ किलो लीटर्सचा केरोसिन कोटा कमी झाला असून, धान्याची मागणीदेखील सहा हजार ७०७ टनांनी घटली आहे. अनेकदा दोन शिधापत्रिकेवर एकाच व्यक्तीची नावे असणे, मृत्यूनंतरही शिधापत्रिकेवरून नावे कमी न करणे, लग्नानंतर मूळ शिधापत्रिकेतील नाव कमी न करता, दुसऱ्या ठिकाणी नवीन शिधापत्रिका काढण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावे वेगवेगळ््या ठिकाणी धान्य कोटा जमा होण्याचा धोका असतो. या शिवाय काही शिधापत्रिकाधारक धान्य घेतदेखील नाहीत. मग अशा व्यक्तींचा कोटा काळ््या बाजारात जिरविला जात असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारी योजना आधार कार्डशी जोडण्यात येत आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा व सांगली या पुणे विभागात एप्रिल २०१६ रोजी ७ हजार ७५४ किलोलीटर्स केरोसिनचा कोटा होता. त्यात ५ हजार ४५१ किलोलीटर्सपर्यंत घट झाली आहे. पुणे जिल्ह्यातील केरोसिनच्या कोट्यात एप्रिल ते डिसेंबर २०१६ दरम्यान २५२, तर शहरातील कोट्यात ९२५ किलोलीटर्सने घट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३९६ किलोलीटर्सने केरोसिनचा कोटा घटला आहे. (प्रतिनिधी)