शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

...तर तुमचा भ्रष्टाचार काढत राहू- मुख्यमंत्री

By admin | Updated: February 8, 2017 21:35 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - महापालिकेतील भ्रष्टाचारावरून माध्यमांचे लक्ष हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने वल्गना केल्या जात आहेत, आव्हानाची भाषा वापरली जात आहे. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही पारदर्शितेचा मुद्दा मांडणार आणि तुमचा भ्रष्टाचार काढत राहणार. आमची विकासकामे सांगणार आणि तुम्ही काय विकास केला हे विचारत राहणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुलुंड येथील आपल्या पहिल्यावहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह स्थानिक आमदार आणि पालिका उमेदवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या हवाल्याने मुंबई पारदर्शी कारभारात प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. मात्र हा अहवाल वाचण्याची तसदीही शिवसेनेने घेतली नाही. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात हैदराबाद आणि बेंगळुरूनंतर मुंबई महापालिकेचा क्रमांक लागतो. हा तिसरा क्रमांकसुद्धा राज्य सरकारमुळे मिळाला आहे. महापालिकेसंदर्भात राज्य सरकारने जे चार अहवाल सादर केले, त्यात पैकीच्या पैकी गुण मिळाले. पात्र, पालिकेच्या ८ पैकी ५ वर्गात यांना भोपळाही फोडता आला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सल्लागारांनी अहवाल अर्धवट वाचला. सल्लागारांच्या माहितीमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळा आल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला.मागील वर्षाचा कार्यअहवाल सादर करणे, वॉर्डनिहाय वित्तीय मागणीचा अहवाल, वर्षभरातील नागरी कामांची आकडेवारी, माहितीच्या अधिकारात आमसभेचे निर्णय कळविणे आणि पालिका अर्थसंकल्पात जनसहभाग या पाचही निकषात पालिकेला शून्य गुण मिळाले आहेत. मग कशाचा आधारावर पारदर्शी कारभाराचे होर्डिंग्ज लावता असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. वॉर्ड कमिटी नेमणे, जनजागृती अशा निकषात मुंबई पालिकेने गुण मिळविले आहेत. वॉर्ड कमिट्या नेमून पालिकेने असा कोणता तीर मारला. केंद्र सरकारच्या अहवालाचा नीट अभ्यास केला असता तर राज्य सरकारमुळेच तुमची इज्जत वाचली हे लक्षात आले असते, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- मुंबई पालिकेतील टेंडरचे मूल्यमापन केले असते, तर यांचा शेवटचा क्रमांक आला असता आणि मुंबईची बदनामी झाली असती. - राज्य सरकारने कोस्टल रोडची परवानगी रखडवल्याचा आरोप केला गेला. त्यावरही उत्तर आहे पण सगळेच आज उघड करणार नाही. कोस्टल रोडबाबत पुढच्या सभेत बोलेन. - सात वर्षं शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिकेच्या कामकाजाचा अंतर्गत लेखा अहवालच तयार होऊ दिला नाही. स्थायी समितीत ही अडवणूक करण्यात आली. - आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. निवडणुकीत टीआरपीचा कलगीतुरा करण्यासाठी आलो नाही. मुद्दई लाख बुरा चाहे क्या होता है; वही होता है जो मंजुरे खुदा होता है!, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फटकारले. - रामदास आठवले यांची कविता मुंबई में हार जायेगी शिवसेना, क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना, हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना...- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे मुखवटे लावून लोक आले होते.