शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:24 IST

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  ‘जेएन-वन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव  ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी सहभागी झाले होते. 

मास्क वापरण्याचे आवाहननागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक व फायर ऑडिट करावे, अशा सूचना दिल्या.

अफवा पसरवू देऊ नका सोशल मीडियावरून तसेच प्रसार माध्यमांवरून नव्या व्हेरिएंटसंदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. चुकीच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होण्याची भीती असते. अफवा पसरणार नाही याकरिता अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.आरोग्य यंत्रणेच्या सर्व यंत्रसामग्री, इतर सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करण्यासाठी १५ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेतल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ, आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. 

ऑक्सिजन प्लँट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाइपलाइन्स, आरटीपीसीआर लॅब सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करावी. लसीकरणाच्या दृष्टीने तयारी ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस