मुंबई : आरोपीसह साक्षीदार व तक्रारदाराचीही ओळख उघड करू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत़या प्रकरणी अॅड़ राहुल ठाकूर यांनी याचिका दाखल केली आहे़ पोलीस एखाद्या घटनेची माध्यमांना माहिती देताना आरोपीचे नाव उघड करतात़ हे गैर आहे़ त्यामुळे आरोपीची नावे उघड न करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ त्याची दखल घेत न्यायलायाने आरोपीची नावे उघड न करण्याचे आदेश शासनाला दिले होते़ (प्रतिनिधी)
साक्षीदार, तक्रारदाराचीही ओळख गुप्त ठेवा - हायकोर्ट
By admin | Updated: November 5, 2014 04:30 IST