शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक ठेवा जपणारी ब्रह्मांड सोसायटी

By admin | Updated: May 14, 2017 02:59 IST

बसच्या फेऱ्या वाढवण्याच्या लढ्यापासून ब्रह्मांड सोसायटीच्या सामाजिक लढ्याला सुरूवात झाली.

- अजित मांडके बसच्या फेऱ्या वाढवण्याच्या लढ्यापासून ब्रह्मांड सोसायटीच्या सामाजिक लढ्याला सुरूवात झाली. पुढे नवनवे विषय हाती घेतले गेले. ब्रह्मांड कट्ट्याने सांस्कृतिक क्रांती घडवली. वाचनालयाची चळवळ उभी राहिली. महिलांसाठी व्यासपीठ खुले झाले... एका सोसायटीने आपल्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवले. सांस्कृतिक ठेवा जपला. समृद्ध केला. सर्वच स्तरांवर हायटेक पद्धतीचा वापर सुरू झाल्याने आपला सांस्कृतिक ठेवा कुठेतरी लोप पावत चालला आहे. नव्या पिढीला हा सांस्कृतिक ठेवा भविष्यात मिळेल की नाही, याबाबत आतापासून अनेकांच्या मनात शंका आहेत. असाच सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम घोडबंदर भागातील ब्रह्मांड सोसायटी कित्येक वर्षे करते आहे. ब्रह्मांड कट्टा, दिवाळी पहाट, ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम, स्वागतयात्रा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदींच्या माध्यमांतून येथील सर्वधर्मीयांना एकत्रित बांधण्याचे काम या सोसायटीने केले आहे.घोडबंदर भागातील ब्रह्मांडची फेज-१ सुमारे २५ वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. सुरुवातीला येथे तीनच इमारती होत्या. आज आठ फेजमध्ये सोसायटी उभी असून प्रत्येक फेजमध्ये सात इमारती आहे. आजघडीला येथे तब्बल साडेतीन ते चार हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे. नुकताच या सोसायटीने आपला रौप्यमहोत्सव साजरा केला. या भागात बसेसचे प्रमाण कमी असल्याने त्यासाठीचा लढा सुरुवातीला या सोसायटीने उभा केला. राजेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यातूनच प्रवासी संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून १५ वर्षांपूर्वी यशस्वी लढा उभा केला. सुरुवातीला या भागात केवळ आझादनगरची एकच बस धावत होती. तिच्या वेळाही एकेक तासाने होत्या. त्यामुळे बसची संख्या वाढण्यासाठी हे आंदोलन झाले. त्यातूनच पुढे धर्माचापाडा बस सुरू झाली. आतातर टीएमटीसह बेस्ट आणि एसटीची बसही या भागातून धावते. हे या सोसायटीचेच यश म्हणावे लागेल. आता मुंबईच्या काही भागांसह अंधेरी, पनवेल आदी ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध झाल्याने सोसायटीसह इतर रहिवाशांनाही याचा फायदा झाला आहे. अशाच उपक्रमातून येथील रहिवाशांच्या मनात सामाजिक भावना रुजू लागली. त्यातूनच १२ वर्षांपूर्वी ब्रह्मांड कट्ट्याची संकल्पना पुढे आली. त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. यामागे उद्देशही तसाच होता. येथील संस्कृतीप्रिय रहिवाशांना व्याख्यानांच्या कार्यक्रमांसाठी ठाण्याच्या विविध भागांत जावे लागत होते. त्यातही ज्येष्ठांना प्रत्येक वेळी जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आपल्याच सोसायटीच्या ठिकाणी ही संकल्पना रुजवण्याची कल्पना राजेश जाधव आणि त्यांचे सहकारी जोशी यांच्या मनात आली. परंतु, त्यांना सतावत होता, खर्चाचा प्रश्न. यातूनही त्यांनी मार्ग काढला. हा खर्च त्यांनी स्वत:च्या खांद्यावर पेलला. आज त्याला सोसायटीमधील इतर सदस्यांनीही हातभार लावला आहे आणि या पाठबळावर कट्ट्याने एका तपाची यशस्वी वाटचाल केली आहे. ब्रह्मांड कट्ट्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची मेजवानीच येथील रहिवाशांना मिळू लागली. आता हा कट्टा एवढा प्रसिद्ध झाला आहे की, या कट्ट्यावरील कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी डोंबिवली, कल्याण आदींसह इतर ठिकाणाहून रसिक येतात. पुढे चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या संकल्पनेतून येथे वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या वाचनालयाचा फायदा येथील आबालवृद्धांना होतो आहे. केवळ एवढ्यावरच या सोसायटीतील सदस्य थांबले नाहीत. नवरात्रोत्सवाची धूम, दरवर्षी भव्य प्रमाणात निघणारी स्वागतयात्रा, स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या माध्यमातून दरवर्षी रंगणारा ब्रह्मांड फेस्टिव्हल, रक्तदान शिबिर... असे भरगच्च उपक्रम सुरू असतात. महिलांसाठीही मायबोली नावाचे व्यासपीठ निर्माण करून देण्यात आल्याने त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कामही या माध्यमातून होताना दिसते. वाद कुठे होत नाहीत? तसे ते याही सोसायटीत होतात, परंतु एखादा प्रसंग ओढवला किंवा काही कार्यक्रम घ्यायचे झाल्यास या सोसायटीमधील सर्वच सदस्य एकदिलाने, एकोप्याने एकत्र येऊन काम करताना दिसतात. या सर्व माध्यमांतून या सोसायटीधारकांनी सामाजिक बांधीलकी तर टिकवली आहेच, शिवाय सांस्कृतिक ठेवा जपण्याचे कामही केले आहे.काही वर्षांपूर्वी येथील एका इमारतीच्या सात घरांमध्ये एकाच वेळी घरफोडी झाली होती. त्यानंतर, येथील सर्वच रहिवासी या प्रसंगातही एकत्र आल्याचे बोधनकर यांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून आज सर्वच सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली सर्व जण असतात. काही प्रसंग असेही असतात की, ज्यातून आपल्याला काहीतरी बोध घ्यावा लागतो. असाच हा प्रसंग म्हणावा लागेल, हेही त्यांनी सांगितले.