शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

केडीएमटीत बसथांब्यांचा चार कोटींचा घोटाळा उघड

By admin | Updated: July 20, 2016 04:14 IST

विविध घोटाळ््यांमुळे केडीएमटीची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता त्यात बसथांब्यांच्या घोटाळ््याची भर पडली आहे.

कल्याण : तिकीट, डिझेल-फिल्टर, इंजिन अशा विविध घोटाळ््यांमुळे केडीएमटीची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता त्यात बसथांब्यांच्या घोटाळ््याची भर पडली आहे. केडीएमटीचे सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. बसथांबे उभारण्यासंदर्भात काढलेल्या निविदेतील अटी-शर्थींचा करारनाम्यात बदल केल्याचे समोर आले आहे. चार कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. केडीएमटीचे नुकसान करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून आर्थिक नुकसान वसूल करावेत, असे पत्र चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहे.केडीएमटीने २०१४ मध्ये अस्तित्वात असलेल्या १२४ बसथांब्यांच्या पुर्नबांधणीसाठी निविदा जाहीर केली होती. यात प्रस्तावित नव्या ११९ बसथांब्यासह थांब्यांचे फलक लावण्यासंदर्भात ५०० खांब उभारण्याचेही नमूद केले होते. निविदा जाहीर करताना स्टेनलेस स्टिलचे बसथांबे असावेत तसेच फ्लोरिंग करणे, मध्यभागी केडीएमटीचा लोगो वापरणे, थांब्याच्या ठिकाणी मार्गावर जाणाऱ्या बसचे वेळापत्रक जाहीर करावे आणि थांब्याचे नाव असावे, अशा अटी-शर्थी होत्या. त्यासाठी सन एन स्टार अ‍ॅडव्हरटायझर्स प्रा. लिमिटेड कंपनीने दाखल केलेली निविदा मंजूर केली. दरम्यान निविदा मंजुरीनंतर केलेल्या करारनाम्यात ‘स्टेनलेस स्टिल’ हा शब्द गहाळ करण्यात आल्याकडे चौधरी यांनी लक्ष वेधले. १२४ ऐवजी ३५ ते ४० बस थांब्यांचीच आतापर्यंत पुर्नबांधणी झाली आहे. यात स्टिलऐवजी लोखंड वापरले. मात्र, तेही सुमार दर्जाचे आहे. भंगार सामानाचा उपयोग करून त्याला रंगरंगोटी केल्याचा चौधरींचा आरोप आहे. (प्रतिनिधी)>दौऱ्यात वास्तव झाले उघड; केडीएमटीची कंत्राटदाराकडून फसवणूक‘लोकमत’ने ‘आॅन द स्पॉट’द्वारे केडीएमटीची दुरवस्था उघड केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी अन्य सदस्यांसह उपक्रमातील कल्याण-रिंगरुट मार्गावरील प्रवासी निवारे बसथांब्यांची पाहणी केली होती. यात त्यांनी शिवाजी चौक, लालचौकी, दुर्गाडी, आधारवाडी, गायकरपाडा, गोल्डन पार्क, खडकपाडा, चिकणघर, भोईरवाडी, इंदिरानगर येथील बसथांब्यांना भेटी दिल्या. यात केडीएमटीचा लोगो नसणे, वेळापत्रक फलक न लावणे, थांब्यांची आसन व्यवस्था अत्यंत खराब असणे, तुटलेल्या अवस्थेतील छत आणि पत्रे, फ्लोरिंग नसणे, थांब्यांवरील मोठ्या प्रमाणातील जाहिरातींमुळे संबंधित उत्पन्न बुडणे आदी त्रुटी आढळून आल्या. यानंतर कंत्राटदारासमवेत झालेला करारनामा तपासला असता केडीएमटी उपक्रमाची झालेली फसवणूक समोर आल्याचे चौधरी यांनी सांगितले.