शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे संजय घरत यांना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:34 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्यांच्या दोन साथीदारांना गुरुवारी कल्याण न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्यांच्या दोन साथीदारांना गुरुवारी कल्याण न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात रात्री उशिरा अटक केलेले नारायण परुळेकर यांना २८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, घरत यांचे दोन मोबाइल जप्त केले असून त्याच्या पासवर्डमुळे तपासाला गती येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी घरत यांच्यासह ललित आमरे (४२) आणि भूषण पाटील (२७) या लिपिकांना आठ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले होते. या तिघांनी तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी आठ लाखांचा पहिला हप्ता बुधवारी देण्याचे ठरले होते. त्यावेळी ही कारवाई करण्यातआली.या प्रकरणात घरत यांच्या दालनात या तिघांची १७ तास चौकशी करण्यात आली. घरत यांच्या डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील मिलापनगर येथील घरीही बुधवारी रात्री छापा टाकण्यात आला. मात्र, तेथे ठोस काही हाती लागलेले नाही. दरम्यान, चौकशीनंतर गुरुवारी सकाळी ८ वाजता तिघांना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथून दुपारी त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले.दरम्यान, न्यायालयाच्या आवारात घरत यांना भेटण्यासाठी कंत्राटदार, उद्योगपती आणि कल्याण-डोंबिवलीतील अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती.मोठा भ्रष्टाचार उघड होईल : एसीबीघरत हे जप्त केलेल्या त्यांच्या दोन मोबाइलचे पासवर्ड देत नाहीत. मोबाइलमध्ये महत्त्वाची माहिती असू शकते. आणखी काही जणांची नावे पुढे येतील. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो, असा संशय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यक्त केला.पैशांची देवाणघेवाण सुरू असताना तक्रारदार आणि घरत यांच्यातील संभाषण रेकॉर्ड केले आहे. पुरावा म्हणून सर्व चारही आरोपींच्या आवाजांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवायचे आहेत, असेही न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर, न्यायालयाने संमती दर्शवत घरत यांच्यासह दोघांना १७ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारjailतुरुंग