शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

कविताला ‘क्लास वन’ अधिकारीपदच हवे!

By admin | Updated: November 8, 2016 04:37 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील खेळाडूंना ‘क्लास वन’ पदावर सेवेत घेण्याची घोषणा केल्यानंतर शासनाने

नाशिक : रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील खेळाडूंना ‘क्लास वन’ पदावर सेवेत घेण्याची घोषणा केल्यानंतर शासनाने वर्ग तीन पदावर आदिवासी विभागात नोकरी दिल्याने त्याचा निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामध्ये नाशिकच्या कविताचाही समावेश करण्यात येऊन तिला आदिवासी विकास विभागात नोकरी देण्यात आली. मात्र वर्ग तीन पदावर नियुक्ती देण्यात आल्याने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कविताने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नियुक्ती देताना शैक्षणिक पात्रतेच्या निकषाकडे दुर्लक्ष केल्याचा आक्षेपही कविताने नोंदविल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी आॅलिम्पियन खेळाडूंना ‘क्लास वन’ पदावर नियुक्ती दिली जाईल, असे जाहीर केल्यानंतरही मला वर्ग तीन पदावर नियुक्त करण्यात आले. वास्तविक अन्य एका आॅलिम्पियनला मात्र वर्ग-१ पदावर नियुक्ती देण्यात आल्याचे कविताने निदर्शनास आणून दिले आहे. खेळाडूंना नोकरीमध्ये सामावून घेताना त्यांची शैक्षणिक अट शिथिल करण्यात यावी, असा निकष आहे. कविता पुढील वर्षी पदवीप्राप्त करणार असल्याने शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देणे अपेक्षित असल्याचे कविताने म्हटले आहे. कविता सध्या ‘ओएनजीसी’मध्ये एक्झिक्युटिव्ह एच.आर. या पदावर कार्यरत आहे. (प्रतिनिधी)