शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य जपणारी कातुर्लीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

१९६० मध्ये कातुर्ली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. १७ विद्यार्थी या शाळेत दाखल झाले. आजघडीला या शाळेची पटसंख्या ७१ इतकी आहे. आधुनिकतेच्या युगात व कॉन्व्हेंट संस्कृतीतही या शाळेने पत राखली आहे. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत. भौतिक सुविधेवर काम करून शाळा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात आली आहे.

ठळक मुद्देभौतिक सुविधेवर भर : लोकसहभागासह ग्रामपंचायतीचेही सहकार्य, गटशिक्षणाधिकाऱ्यांचीही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सहा दशकांपूर्वी पवनी पंचायत समिती अंतर्गत स्थापित करण्यात आलेली कातुर्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावासाठी शान ठरली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य रूजविणारी शाळा म्हणून ओळखली जात आहे. मुलांची शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य यासह शिक्षकांचे प्रयत्न नावारुपास येत आहे.१९६० मध्ये कातुर्ली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. १७ विद्यार्थी या शाळेत दाखल झाले. आजघडीला या शाळेची पटसंख्या ७१ इतकी आहे. आधुनिकतेच्या युगात व कॉन्व्हेंट संस्कृतीतही या शाळेने पत राखली आहे. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत. भौतिक सुविधेवर काम करून शाळा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात आली आहे. शाळेतील आतील व बाहेरील भागात पेव्हर ब्लॉक सबमर्सीबल स्वच्छता गृह आदी कामे करण्यात आली आहेत. याशिवाय नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बेसीक नॉलेज, रोज एक वर्ग एक म्हण, बचत बँक, शैक्षणिक साहित्य स्टॉल यासह स्नेहसंमेलन, जयंती उपक्रम आदी कार्यक्रम घेतले जात आहेत.शाळेची भौतीक स्थिती आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी चंग बांधला आहे. यात पालकांच्या सहकार्याने तो बदल घडवून आणला. शिस्त, मूल्य यांची घडण विद्यार्थ्यांमध्ये देण्यास ही शाळा यशस्वी ठरली आहे.५२ हजारांची लोकवर्गणीशाळेत विविध कामे करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणी गोळा करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. या अंतर्गत जवळपास ५२ हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा झाली आहे. यात शाळा, रंगरंगोटी, स्वच्छता करणे यासह आदी कामे केली जात आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या या कामात विद्यार्थ्यांचेही महत्वपूर्ण योगदान आहे. शिस्त व अनुशासन यांचे पालन नित्यनियमाने केले जात आहे.शाळेत भौतीक बदल घडवून आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीसह सर्वांचेच सहकार्य लाभत आहे.-अशोक तिडके, मुख्याध्यापकशिक्षकांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीत वाढ झाली आहे. यासह गटशिक्षणाधिकारी एन.टी. टिचकुले व केंद्रप्रमुख बी.आर. मेश्राम यांचेही सहकार्य आहे.-खुशाल शहारे, अध्यक्ष शा.समिती

टॅग्स :Schoolशाळा