शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकावर कत्तीने हल्ला

By admin | Updated: July 22, 2016 17:02 IST

उधारीचे पैसे मागितल्याने एका हॉटेल चालकाच्या मानेवर, खांदा व डोक्यात पाच वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील नागरसोगा येथे शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या

ऑनलाइन लोकमतऔसा, दि. 22 -  उधारीचे पैसे मागितल्याने एका हॉटेल चालकाच्या मानेवर, खांदा व डोक्यात पाच वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील नागरसोगा येथे शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली़. यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल चालकावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  दरम्यान, या घटनेतील आरोपी स्वत: औसा पोलिस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.नागरसोगा (ता़ औसा) येथील तुकाराम लक्ष्मण ससाणे (६६) यांनी शुक्रवारी पहाटे ४ वाजता आपली चहाची टपरी उघडली आणि चहा करीत होते. तेव्हा गावातील स्वप्नील रामकिशन अडसुळे हा तिथे आला आणि चहा दे रे म्हणाला. यावेळी हॉटेल चालक ससाणे यांनी तू असे का बोलत आहेस असे विचारले़ तेव्हा त्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून व चहा लवकर दे म्हणून हातातील कत्तीने तुकाराम ससाणे यांच्या मानेवर पाच वार केले. मानेवर तीन, खांद्यावर आणि डोक्यात प्रत्येकी एक वार करण्यात आला. अचानक वार झाल्याने ससाणे हे जमिनीवर कोसळले. दरम्यान, तेथून जाणाऱ्या परमेश्वर शिंदे यांनी ही घटना पाहून इतरांना उठवले व जखमी तुकाराम ससाणे यांना तत्काळ उपचारासाठी औसा येथे हलविले़ प्रथमोपचारानंतर त्यांना लातूरला हलविण्यात आले़ त्यांच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असून ५० टाके पडल्याचे सांगण्यात आले. उधारी मागितल्याने आपल्या अंगातील बनियन फाडून कत्तीने वार केले व खिशातील काही पैसे काढून घेतल्याचे ससाणे यांनी पोलिस जबाबात म्हटले आहे. दरम्यान, आरोपी स्वप्नील अडसुळे हा स्वत:च पोलिसात हजर झाला. औसा पोलिसांनी त्यास अटक केली आहे. औश्याचे पो.नि. विकास जाधव, उपनिरीक्षक हनुमान बांगर, सपोउनि गुरुलिंग वाडकर, पोहेकॉ दशरथ घाडगे, विष्णू वायगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.