शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

कऱ्हाडला कमळ फुलविण्याचा घाट!

By admin | Updated: November 27, 2014 00:11 IST

नुसते पुढे नेऊ नका, तर बरोबर घ्या ! --सदाभाऊ अलिप्तच !

प्रमोद सुकरे - कऱ्हाड संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची मंगळवारी पुण्यतिथी झाली़ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यभरातील नेत्यांबरोबर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यशवंतरावांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळी नतमस्तक झाले खरे; परंतु याच कऱ्हाडात भाजपच्या तीन लाख सदस्य नोंदणीचा नारळही त्यांनी फोडला. आजपावेतो, काँगे्रस संस्कृतीत रमलेल्या कऱ्हाडच्या घाटावर कमळं फुलविण्याचा घाटही याच देवेंद्रपंतांच्या पक्षानं घातलाय़ कऱ्हाडच्या राजकीय पंढरीत प्रत्येक वर्षी २५ नोव्हेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मेळा भरतो़ कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करून ही मंडळी नवी प्रेरणा घेऊन कामाला लागतात़ यंदाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि यशवंतरावांचे मानसपुत्र शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ़ पतंगराव कदम, रामराजे नाईक - निंबाळकर यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मान्यवरांनी सकाळी सकाळीच स्मृतिस्थळाला अभिवादन करून स्फूर्ती घेतली़ दुपारी साडेबारा वाजता राज्यातील भाजप सरकारचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमान लँड झाले, अन् त्यांच्याबरोबर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिलीप येळगावकर, पृथ्वीराज देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ भरत पाटील, डॉ़ अतुल भोसले व पदाधिकाऱ्यांचा ताफा स्मृतिस्थळावर पोहोचला़ एरव्ही काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गजबजणारा हा परिसर भाजप कार्यकर्त्यांनी फुलला.त्यानंतर भाजपने उभारलेल्या सभासद नोंदणी कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले आणि जिल्हाध्यक्ष पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी जिल्ह्यात तीन लाख सभासद नोंदणी करण्याचा संकल्प सोडला़ या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्यावर मदार ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले़ विमानतळावर आल्यापासून मुख्यमंत्री परत जाईपर्यंत पाटील सावलीप्रमाणे त्यांच्या बरोबरच होते़ सदाभाऊ अलिप्तच !मुख्यमंत्री फडणवीस स्मृतिस्थळी असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत प्रीतिसंगमावरच होते; पण मित्रपक्ष असतानाही खोतांनी त्या मेळात न घुसता अलिप्त राहणे पसंत केले़ मुख्यमंत्री गेल्यावर त्यांनी चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन केले़ नुसते पुढे नेऊ नका, तर बरोबर घ्या ! --प्रीतिसंगमावर मुख्यमंत्री फडणवीस आल्यानंतर त्यांच्यासोबत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे आजी-माजी आमदार होते़ तर त्यांच्या पाठीमागून काही अंतरावर शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई चालत होते़ तेव्हा पत्रकारांनी देसार्इंना तुम्ही मागे का? बरोबर का नाही? असे विचारले़ तेव्हा ‘आम्ही सरकारमध्ये बरोबर नाही़,’ असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले़ तर मागून आलेले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी देसार्इंच्या हातात हात घालून त्यांना फडणवीस यांच्याकडे पुढे स्मृतिस्थळावर नेले़ तेव्हा ‘त्यांना बरोबर घ्या,’ असा चिमटा एकाने काढला़ त्यानंतर विमानतळावर मात्र या दोन मित्रांनी एकमेकांशी संवाद साधला़ हा संवाद कोणत्या विषयावर झाला याबाबत उलटसुलट चर्चा आहे़ भाजपचे पहिलेच मुख्यमंत्रीयशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाडला त्यांच्या स्मृतीला प्रत्येक वर्षी अभिवादन करायला राज्याचे मुख्यमंत्री येतात; पण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे फडणवीस हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत़ राज्यात युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी देखील अभिवादनासाठी उपस्थित राहिले होते़