शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा ही चुकच !

By admin | Updated: April 26, 2016 02:05 IST

जाती तोडो, समाज जोडो अभियानाप्रित्यर्थ बुलडाणा येथे आले असता रामदास आठवले यांची लोकमतशी चर्चा.

सिध्दार्थ आराख/बुलडाणाजेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने देशाविरूध्द घोषणा दिल्या नव्हत्या, हे आता सिध्द झाले आहे. या प्रकरणाच्या कारवाईत दिल्ली पोलिसांची घाई दिसून आली आहे. कोणतीही चौकशी न करता पोलिसांनी कन्हैयावर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून चुकच केली, असे मत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जाती तोडो, समाज जोडो ही कन्याकुमारीहून निघालेली भारत भीमरथ यात्रा रविवारी बुलडाण्यात दाखल झाली, त्यावेळी ते 'लोकमत'शी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर मनमोकळी चर्चा केली.प्रश्न : सध्या कन्हैयाच्या महाराष्ट्रात सभा आणि त्याच्यावर ठिकठिकाणी हल्ले होत आहेत, याबद्दल काय वाटते?कन्हैया कुमारवर हल्ले करून उगाच त्याला कोणी मोठे करू नये, तसा तो दोषीही नाही. त्याने व त्याच्या मित्रांनी देशाविरूध्द घोषणा दिल्या नव्हत्या; मात्र अफजल गूरुच्या फाशीच्या दिवशी कन्हैया आणि त्याचे संघटन एकत्र का आले होते, याचे उत्तर त्यानेच द्यावे. जेएनयुच्या घटनेमध्ये दिल्ली पोलिसांनीच त्याला मोठे केले. आता ठिकठिकाणी त्याच्यावर हल्ले करून त्याला पुन्हा हिरो बनविले जात आहे. हे चुकीचे आहे. हे थांबले पाहिजे.प्रश्न : रोहीत वेमुलाप्रकरणी आपली काय भूमिका काय ?रोहित वेमुलावर अन्यायच झाला. रोहीतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी झाली पाहीजे. मी स्वत: राज्यसभेत सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होता काम नये आणि आत्महत्येची वेळ तर येऊच नये. प्रश्न : वेगळ्य़ा विदर्भाच्या मागणीवर सर्वच विदर्भवादी एकत्र का येत नाहीत, ही श्रेयाची लढाई आहे काय? वेगळ्या विदर्भासाठी सर्वच विदर्भवादी एकत्र येत नसले, तरी सर्वांची मागणी एकच आहे. श्रेय कुणी घ्यायचे तो नंतरचा प्रश्न आहे. आधी विदर्भ वेगळा होऊ द्या. भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरच निवडणुका लढल्या आणि ते आपल्या मुद्यावर ठाम आहेत. शिवसेना वगळता सर्वच पक्ष आरपीआयसहीत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. प्रश्न : न्यायालयाचे आदेश असताना महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे योग्य आहे काय ? घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे मंदिरात महिलांनाही प्रवेश मिळायलाच पाहिजे, या मताचे आपण आहोत. तो घटनादत्त अधिकार आहे. त्याचे उल्लंघन होऊ नये. प्रश्न : रिपाइंच्या ऐक्यावर केवळ चर्चा होते, ऐक्य का होत नाही ? चर्चा झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला मुर्त स्वरुप येत नाही. योग्य वेळी रिपाइंचे सर्व गट-तट एकत्र येतील आणि ऐक्य निश्‍चित होईल. त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणण्याची गरज आहे. आपण स्वत: यासाठी पुढाकार घेणार आहोत. येणार्‍या निवडणुकीपूर्वी ऐक्य झाल्यास इतर पक्षांना हादरा बसेल यात शंका नाही. प्रश्न : येणार्‍या निवडणुकामध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय राहील ? आम्ही भाजपला केवळ पाठिंबा दिला आहे. आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. येणार्‍या काळात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन पक्ष बांधणी करणार आहोत व सर्वच जातीच्या घटकांना पक्षात संधी देण्यात येईल.