शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीच्या ईएसआयएस रुग्णालयाला परत मिळाले पालिकेकडून ‘कोविड वॉर्ड’

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 26, 2024 20:10 IST

Mumbai News: संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या कोविड महामारीला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतलेले कांदिवली पूर्व येथील ईएसआयएस रुग्णालयातील काही वॉर्ड अखेर पुन्हा रुग्णालयाकडे हस्तांतरीत केले.

- मनोहर कुंभेजकर मुंबई - संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या कोविड महामारीला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतलेले कांदिवली पूर्व येथील ईएसआयएस रुग्णालयातील काही वॉर्ड अखेर पुन्हा रुग्णालयाकडे हस्तांतरीत केले. या रुग्णालयाला केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी गेल्या रविवारी भेट दिली होती. त्यावेळी हे वॉर्ड अद्यापही पालिकेकडेच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतचे निर्देश दिले. त्यानंतर तातडीने ही कार्यवाही झाली असून आता या वॉर्डांमध्ये ईएसआयएसच्या रुग्णांची सोय होणार आहे.

महापालिकेने कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वर्ष २०२०-२१ दरम्यान ईएसआयएस रुग्णालयातील काही वॉर्डस् व्यापले होते. आता कोविड-१९ महामारी संपली असून आपण आपल्या रुग्णालयाच्या नियमित वॉर्ड्सचा वापर सुरू करू शकता. तसेच वॉर्ड्समधील साहित्य पुढील सात दिवसांत हलवले जाईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांनी पत्राद्वारे ईएसआयएस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना कळवले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका