शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

पराभवानंतर राज्यात काँग्रेसमध्ये 'कामराज प्लॅन'

By admin | Updated: May 30, 2014 16:09 IST

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर सोनिया गांधी यांनी राज्यात काँग्रेसमध्ये 'कामराज प्लॅन' राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

 ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ३० - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यात 'कामराज प्लॅन' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मंत्रिमंडळातील चार विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांना पक्षात सक्रीय करण्यात येईल. तर पक्षातील तीन तडफदार पदाधिका-यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पक्षात नव्याने उत्साह आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीतील राज्यातील कामगिरीसंदर्भात शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधींनी राज्यात मंत्र्यांच्या मतदारसंघातील काँग्रेसच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. राज्यात काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर विजय मिळाला असून बहुसंख्य मंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेस पिछाडीवर गेली होती.

काय आहे कामराज प्लॅन
१९६३ मध्ये काँग्रेस नेते व तत्कालीन मद्रासचे मुख्यमंत्री के. कामराज यांनी एक नवीन संकल्पना राबवली होती. त्यावेळी काँग्रेसची लोकप्रियता घटत असल्याचे लक्षात आल्यावर कामराज यांनी एक तोडगा काढला होता. यानुसार काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षात सक्रीय व्हायचे. यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळू शकेल असे कामराज यांचे म्हणणे होते. कामराज यांच्या सूचनेनंतर लालूबहादूर शास्त्री, जगजीवन राम, मोरारजी देसाई, एस.के.पाटील या सारख्या ज्येष्ट नेत्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षकार्यात सक्रीय झाले होते. कामराज यांची ही संकल्पना भारतीय राजकारणात कामराज प्लॅन म्हणून ओळखली जाते.