शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
3
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
4
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
5
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
6
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
7
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
8
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
9
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
10
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
11
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
12
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
13
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
14
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
15
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
16
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
17
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
18
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
19
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
20
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत

कामत समर्थकांचे काँग्रेस कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: June 8, 2016 20:39 IST

शिवसेना-भाजपा पाठोपाठ आता काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूसही बाहेर पडू लागली आहे़. काँगे्रसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी रद्द करावा, यासाठी

- २५ नगरसेवकांचे राजीनाम्याचे दबावतंत्रमुंबई, दि. ८ - शिवसेना-भाजपा पाठोपाठ आता काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूसही बाहेर पडू लागली आहे़. काँगे्रसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी रद्द करावा, यासाठी त्यांच्या समर्थकांनी मुंबई प्रदेश कार्यालयासमोर आज शक्तिप्रदर्शन केले़. मात्र याची दखल पक्षाने न घेतल्यास २५ जण राजीनामा देतील, असा बंडच काँग्रेस नगरसेवकांनी पुकारला आहे़ ऐन निवडणुकीत काँग्रेसला हा मोठा झटका असून महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदही यामुळे संकटात येण्याची चिन्हे आहेत़.पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत़ त्याच दरम्यान काँग्रेसमधील गटबाजीही चव्हाट्यावर आली आहे़. कामत यांनी मंगळवारी पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे़. ही नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचण्यासाठी कामत समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आज तीव्र निदर्शने केली़.

२५ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीतआपल्या नेत्याचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी नाकारावा यासाठी कामत समर्थक नगरसेवकांनी दबावतंत्र सुरु केले आहे़. त्यानुसार पालिकेतील काँग्रेसच्या संख्याबळाच्या निम्मे म्हणजे २५ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत़. कामत यांचा राजीनामा रद्द करा, नाहीतर गुरुवारी २५ नगरसेवक राजीनामा देतील, असा सज्जड इशाराच या समर्थकांनी दिला आहे़. देवेंद्र आंबेरकर, ज्योत्सना दिघे, मोहसीन हैदर, भौमसिंग राठोड, शितल म्हात्रे, सुषमा राय, चंगेझ मुल्तानी हे काही नगरसेवक कामत समर्थक म्हणून ओळखले जातात़.विरोधी पक्षनेते पद संकटातमहापालिकेत काँग्रेसचे ५१ नगरसेवक असून गुरुदास कामत आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम असे दोन गट आहेत़. या दोन्ही गटांमध्ये आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी चढाओढ सुरु असते़. कामत गटाचे देवेंद्र आंबेरकर यांचा पत्ता साफ करुन निरुपम गटाचे प्रवीण छेडा यांची काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाली़. मात्र कामत गटही आता आक्रमक झाले आहे़ निरुपम गटाला शह देण्यासाठी राजीनामा देण्याचे हत्यारचं त्यांनी उपसले आहे़. २५ नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास काँग्रेस विरोधी बाकावरील सर्वात मोठा पक्ष राहणार नाही़ त्यामुळे विरोधी पक्षनेते पदही संकटात येईल़.कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनदरम्यान, गुरुदास कामत यांनी आपल्या समर्थकांना मोर्चा काढणे, राजीनामा देण्यास मनाई केली आहे़. तसेच निदर्शने करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे़.