पुणे : चित्रपटांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची फळी उभारण्यारोबरच एक चळवळ निर्माण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (एनएफएआय) इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ फिल्म अर्काईव्हज (एफआयएएफ) आणि फिल्म हेरिटेज फौंडेशन (एफएचएफ) च्या सहकार्यातून आयोजित केलेल्या दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपाला अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते अशी तिहेरी भूमिका बजावणारे कमल हसन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. आज देशात चित्रपट संस्कृती निर्माण झाली असली तरी चित्रपटांचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. त्यादृष्टीने ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरत आहे. या कार्यशाळेत भविष्यात चित्रपट जतन आणि त्याचे संवर्धन कसे करावे याचे व्याख्यानासह प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून धडे देण्याचे काम करण्यात येत असून, यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. (प्रतिनिधी)
समारोप समारंभाला येणार कमल हसन
By admin | Updated: March 3, 2016 01:21 IST