शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाचा गळा धरून दादागिरी करणा-या 'त्या' तिघांविरोधात कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 17:27 IST

दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला होता. लोकमतनं दाखवलेल्या त्या व्हिडीओची दखल रेल्वे प्रशासनानंही घेतली आहे. कल्याणमधल्या धावत्या रेल्वे गाडीत बसण्याच्या जागेवरून वाद करून प्रवाशाचा गळा धरणा-या त्या तीन जणांच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देकल्याणहून अंबरनाथला जाणा-या लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाणबेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ लोकमतच्या हाती, लोकमतनं दाखवलेल्या त्या व्हिडीओची रेल्वे प्रशासनानंही घेतली दखल त्या तीन जणांच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली

कल्याण, दि. 12 - दोन दिवसांपूर्वी कल्याणहून अंबरनाथला जाणा-या लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला होता. लोकमतनं दाखवलेल्या त्या व्हिडीओची रेल्वे प्रशासनानंही गंभीर दखल घेतली आहे. अंबरनाथला जाणा-या धावत्या रेल्वे गाडीत बसण्याच्या जागेवरून वाद करून प्रवाशाचा गळा धरणा-या त्या तीन जणांच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.प्रवाशाचा गळा धरून त्याला गाडीतून उतरण्यास भाग पाडणा-यांची नावे दीपक मालकोटे, आनंद गायकवाड आणि तुषार घाणेकर असून, ते तिघेही अंबरनाथ येथे राहणारे आहेत. त्यापैकी दीपक व तुषार हे कुरिअर कंपनीत कामाला असून, आनंद हा गॅस एजन्सीत काम करतो. 7 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून सात मिनिटांनी कल्याणहून अंबरनाथच्या दिनेशे जाणा-या रेल्वे गाडीत एक प्रवासी चढला. चौथ्या सीटवर बसण्याच्या वादातून उपरोक्त तीन जणांनी त्याच्याशी वाद घातला. त्याचा गळा धरून त्याला उल्हासनगर रेल्वे स्थानकात उतरण्यास भाग पाडले. प्रवाशासोबत दादागिरी करून त्याला उतरण्यास भाग पाडण्याचा हा सगळा प्रकार अन्य एका सह प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. ही व्हिडीओ क्लिप ऑनलाइन लोकमतच्या हाती लागली होती. ही क्लिप ऑनलाइन लोकमतने दाखवली होती. प्रवाशांकडून होत असलेल्या दादागिरीचा लोकमतनं पर्दाफाश केला होता. त्यामुळे रेल्वे पोलिसांनाही याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यांनी दादागिरी करणा-या त्या प्रवाशांचा शोध सुरू केला. लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केली होती. 

दरम्यान, काही वृत्तवाहिन्यांनी प्रवाशाचा गळाच धरला नाही, असे वृत्त दिले होते. तसेच गावठी कट्टा दाखवून त्याला ठार मारण्यासाठीही धमकाविले, असा दावा केला होता. मात्र या वृत्ताचा कल्याण रेल्वे पोलिसांनी इन्कार केला आहे. व्हिडीओ क्लीपमध्ये दिसणारा गावठी कट्टा नसून मोबाईल आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ज्या प्रवाशासोबत हा प्रकार घडला. त्याच्याकडून कोणतीही तक्रार नसल्याने केवळ व्हिडीओ क्लिपच्या आधारे संबंधितांच्या विरोधात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.