शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कालवार गावात दारूभट्टीवर छापा

By admin | Published: June 24, 2015 1:54 AM

भिवंडी तालुक्यातील कालवार गावात राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने छापा मारु न दारूच्या भट्टीसह दोन गोदामे उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे २ हजार ७०० लीटर गावठी दारु जप्त केली आहे

ठाणे : भिवंडी तालुक्यातील कालवार गावात राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने छापा मारु न दारूच्या भट्टीसह दोन गोदामे उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे २ हजार ७०० लीटर गावठी दारु जप्त केली आहे. विशेष म्हणजे, ही भट्टी चक्क शाळेच्या बाजूलाच सुरू असूनही पोलीस आणि संबधीत यंत्रणेला त्याची माहितीही नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मुंबईच्या मालवणी भागात विषारी दारु प्यायल्याने १०० पेक्षा अधिक जण ठार झाल्यानंतर बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या दारूच्या अड्यांवर धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. सोमवारी ठाणे आणि उल्हासनगरातील ७ दारु अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. आता ग्रामीण भागातील दारु अड्ड्यांवर कारवाई सुरु केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महाराष्ट्र राज्याच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांना भिवंडीच्या कालवार गावामध्ये बेकायदेशीरपणे दारु ची भट्टी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांच्या भरारी पथकाने कालवार गावात छापा मारला. त्यावेळी येथील मराठी शाळेच्या बाजूलाच एक दारु ची भट्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ती सील केल्यानंतर आजूबाजूला तपासणी केली असता, दोन गोदामांमध्ये पिंप आणि कॅन्समध्ये भरलेली सुमारे २ हजार ६९० लीटर गावठी दारु आढळली. या दारु सह सुमारे ३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. (प्रतिनिधी)