शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कदमने बँक मॅनेजरला धमकावले होते

By admin | Updated: August 21, 2015 00:57 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित आमदार रमेश कदम कायद्याच्या पकडीतून सुटू नये म्हणून सीआयडीने

डिप्पी वांकाणी, मुंबईलोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित आमदार रमेश कदम कायद्याच्या पकडीतून सुटू नये म्हणून सीआयडीने केलेली विशेष सरकारी वकील देण्याची मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार कदमच्या विरोधातील खटल्यात प्रवीण चव्हाण सरकारच्या वतीने बाजू मांडतील. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) अंतर्गत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या महामंडळाचा पैसा ज्या बँकांमध्ये ठेवण्यात आला होता त्या बँकांच्या व्यवस्थापकांना रमेश कदमने धमक्या दिल्या होत्या. बुलडाण्याच्या महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकाने मोठी रक्कम काढण्यास नकार दिल्यावर रमेश कदमने त्यांना ‘ये पैसा हमारा है. तेरे पास सिर्फ रखने को दिया है,’ अशा शब्दांत धमकावले होते. रमेश कदमने ५५ कोटी रुपये बँकेतून काढले होते, असे सीआयडीला आढळले. हा पैसा त्याने निवडणुकीत वापरला. या भ्रष्टाचाराची व्याप्ती (३८५ कोटी रुपये) आणि या प्रकरणात असलेले अनेक तांत्रिक पुरावे बघता आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला ज्येष्ठ वकिलाची गरज आहे. या खटल्यात राज्याची बाजू विशेष सरकारी वकिलाने मांडावी असा प्रस्ताव आम्ही मांडला. त्यानुसार नेमलेल्या प्रवीण चव्हाण यांनी यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांविरुद्धच्या मोठ्या खटल्यात सरकारची बाजू मांडली आहे, असे सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटींवर सांगितले.साठे महामंडळाचे खाते असलेल्या बँकांमधून कदमने इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने काढून घेतलेल्या ५५ कोटी रुपयांचा शोध आम्ही आता घेत आहोत, असेही हा अधिकारी म्हणाला. रमेश कदमने बीड, हिंगोली, भंडारा, परभणी, जालना आणि बुलडाणा येथून हे ५५ कोटी रुपये काढले. एवढी मोठी रक्कम काढताना अधिकाऱ्यांनी विचारणा केली असताना रमेश कदमने मातंग समाजातील गरजू व्यक्तींना गाय, म्हैस, शेळ्यांसारखी जनावरे विकत घेण्यासाठी मी मदत करणार आहे. कारण ही जनावरे विकणारा चेक घेत नाही व त्यामुळे त्यांना रोख रकमेची गरज आहे, असे सांगितले. त्या त्या ठिकाणचे व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक यांनी त्याच्याशी हातमिळवणी होती, असे हा अधिकारी म्हणाला.हा अधिकारी म्हणाला की, ‘‘कदमने खर्च केलेल्या ५५ कोटी रुपयांचा माग काढणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. त्याने हा पैसा बँक व्यवहारांद्वारे खर्च केला असून, त्यांचे पुरावे हे आॅनलाइन आहेत. परंतु ५५ कोटी रुपये परत मिळविणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. त्याने हे पैसे काढले ती वेळ महत्त्वाची आहे कारण तेव्हा निवडणुकांची घोषणा होणार होती. त्याने हा पैसा त्याच्या निवडणुकीतील प्रचारासाठी वापरला असावा, असा आमचा संशय असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.