शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

न्या. राधाकृष्णन समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 20:40 IST

मुंबई : राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्था व त्या ठिकाणची बंदी क्षमता वाढविण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या निवृत्त न्या. डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

- जमीर काझीमुंबई : राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्था व त्या ठिकाणची बंदी क्षमता वाढविण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या निवृत्त न्या. डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याबाबत आवश्यक असलेले कामकाज पूर्ण न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.पाच जणांच्या या समितीला आता पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत आपला अहवाल सादर करावयाचा अवधी मिळणार आहे. राज्यातील ९ मध्यवर्ती कारागृहासह सर्व जिल्हा अ, ब व क वर्ग कारागृहात तेथील क्षमतेपेक्षा सुमारे अडीचपट कैदी ठेवण्यात येत असल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. जेलमधील कैद्यातील गॅँगवार, रक्षकांकडून कैद्यांना होणारी मारहाण, त्याचे पलायनाच्या घटना वारंवार घडत असल्याने उच्च न्यायालयात २०१५ मध्ये दाखल असलेल्या जनहित याचिकेवर कोर्टाने या वर्षी एम मार्चला निर्णय देताना कारागृहाची पाहणी करून तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने कारागृहाच्या अद्ययावतीकरणासाठी ६ जूनला उच्च न्यायालयातील निवृत्त न्या. डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्याची समिती नेमली होती. मात्र निर्धारित मुदतीमध्ये समितीला काम पूर्ण करता आलेले नाही. अद्याप अनेक कारागृहाना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणे बाकी असल्याने अहवाल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे समितीला आणखी सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे गृह विभागातील अधिका-याने स्पष्ट केले.----------या समितीमध्ये राधाकृष्णन यांच्यासह , राज्याचे कारागृह महानिरीक्षक व अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सेवानिवृत्त कारागृह उपमहानिरीक्षक एस.एन. चव्हाण, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स, डॉ. विजय राघवन, आणि गृह विभागातील (तुरुंग) उपसचिव दर्जाचा अधिकारी सदस्य आहे.---------सुधारणा समितीची जबाबदारी* जेलच्या क्षमतेपेक्षा जास्त बंदी असल्याने कायद्यात्मक तरतुदी व सवौच्च न्यायालयाच्या या संदर्भातील निर्णयाचा अभ्यास करुन न्यायालयीन बंदी (कच्चे कैदी) संख्या कमी करण्याबाबतचे उपाय*भविष्यातील २५-३० वर्षाचा अभ्यास करुन कारागृह बांधणे,* अस्तित्वात असलेल्या कारागृहाची बंदी क्षमता वाढविण्याबाबत 

 

टॅग्स :Mumbaiमुंबई