शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

जुन्नरवासीयांनाही हवे नवे विमानतळ

By admin | Updated: November 3, 2016 01:22 IST

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी गावाने पठार भागात विमानतळ व्हावा

बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी गावाने पठार भागात विमानतळ व्हावा, यासाठी ग्रामपंचायतचा ठराव करून पाठविला होता. त्यानंतर या ठरावास आणे, नळावणे आणि पेमदरा या ग्रामपंचायतींनीही अनुकूलता दाखविली असून, तसा ठराव या ग्रामपंचायतींनीही केला आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.मागील सात वर्षांपासून पुणे विमानतळ मंजूर होऊनदेखील जागेअभावी वारंवार जागा बदलूनदेखील स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रत्यक्ष विमानतळासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. चाकण, खेड आणि आता पुरंदर या ठिकाणी नियोजित विमानतळाचा प्रस्ताव आहे. परंतु बागायती क्षेत्र तसेच जमिनीचे भाव या कारणांमुळे स्थानिक शेतकरी जमीन देण्यास विरोध करीत आहेत. वरील कारणांचा विचार केला असता, पुण्यापासून १०० कि.मी.अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व पठार भागावरील आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा या गावांना लाभलेल्या सुमारे नऊ हजार हेक्टर सलग व समतल जमीन विमानतळासाठी विचाराधीन घेतला जाऊ शकतो, असे येथील ग्रामस्थांना वाटते. या भागाची भौगोलिक स्थिती पर्जन्यमान, शेती, दळणवळण या गोष्टींचा विचार केला असता, विमानतळासाठी या ठिकाणी सलग जमीन उपलब्ध होऊ शकते.पर्जन्यमान कमी असल्याकारणाने हजारो एकर पठार भाग पडीक असून, लागवडीखालील क्षेत्रातही पावसाळी पिके घेतली जातात. दळणवळणाच्या दृष्टीने विचार केला असता, पुणे, नाशिक, संगमनेर, मुंबई, अहमदनगर ही सर्व शहरे १०० ते १५० कि.मी.च्या अंतरावर असून, पुणे, नाशिक आणि कल्याण-नगर महामार्ग याच भागातून गेले आहेत. भविष्यात या दोन्हीही महामार्गावर रेल्वेलाइनसुद्धा प्रस्तावित आहे. शेतमाल निर्यातीच्या दृष्टीने विचार केला असता, जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगाव, पारनेर, संगमनेर या भागात आधुनिक शेती केली जाते. पुणे विमानतळ हा प्रवासी वाहतूक त्याचबरोबर शेतमाल आणि औद्योगिक माल निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, जुन्नरच्या पूर्व पठार भागात असलेली जागा या सर्व बाबींचा विचार केला असता, योग्य असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे विमानतळ या भागात झाल्यास स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा विमानतळ होण्यास विरोध असणार नाही. या प्रस्तावाचा शासनाने लवकरात लवकर विचार करून सर्व्हे करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार व आमदार यांना पाठविण्यात आल्या असून, शासन आता यावर काय निर्णय घेते, याची उत्सुकता येथील ग्रामस्थांना लागली आहे.