शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दौंडला विशेष सभेत गदारोळ

By admin | Updated: July 23, 2016 01:43 IST

दौंड नगर परिषदेच्या विशेष सभेत आरक्षण क्रमांक ५१च्या मुद्द्यावरून अभूतपूर्व असा गदारोळ झाला.

दौंड : दौंड नगर परिषदेच्या विशेष सभेत आरक्षण क्रमांक ५१च्या मुद्द्यावरून अभूतपूर्व असा गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या दोन नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या टेबलवर अक्षरश: डोके आपटून घेतले. टेबलवर हात मारणे, एकमेकांच्या अंगावर धाऊन जाणे यामुळे एकूणच सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सभेतून सत्ताधाऱ्यांनी पळ काढला, असा आरोप नगर परिषदेतील विरोधी गटनेते बादशाह शेख यांनी केला, तर विशेष सभा पूर्ण होऊन विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याचे प्रभारी नगराध्यक्षा आकांक्षा काळे यांनी स्पष्ट केले. गोपाळवाडी रोडवरील मंडईसाठी आरक्षणाची जागा संपादित करायची हा विषय आला. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले, दौंडच्या विस्तारीत भागात मंडई असणे गरजेचे आहे. या विषयाला सर्वानुमते मंजुरी मिळाली. आरक्षण क्रमांक ५१मधील १५ हजार चौरस मीटर जागेवर नगर परिषदेचे आरक्षण आहे. परंतु सदरची जागा मूळ मालकाला हायस्कूलसाठी विकसित करण्यासाठी द्यायची आहे, जमीनमालकाच्या अर्जावर चर्चा करून निर्णय घेण्याचा विषय पुढे आल्यानंतर विरोधी गटनेते बादशाह शेख म्हणाले, या जागेच्या मूळ मालकाने ठरावाला विरोध न करण्याच्या बदल्यात, मला आॅफर केली. तुमच्या निवडणुकीचा सर्व खर्च मी करेन.’ असे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी खर्च करायला निघालेल्या जागामालकांनी मग सत्ताधाऱ्यांसाठी काय तरतूद केली असेल? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. जमीनमालकाने निवडणूक खर्च करण्याचे आमिष दाखवले. मग शेख यांनी पोलिसांकडे तक्रार का दिली नाही, असा प्रश्न कटारिया यांनी उपस्थित केला. हा विषय मंजूर करू नका, असे शेख यांनी सांगताच, हा विषय मंजूर करा, असा सूर सत्ताधारी नगरसेवकांनी लावला.अखेर शेख यांनी नगराध्यक्षा आकांक्षा काळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्या टेबलाजवळ जाऊन डोके आपटून घेतले. तर सत्ताधारी नगरसेवक प्रमोद देशमुख यांनीही विषय मंजुर करा असे म्हणत डोके टेबलावर आपटून घेतले. ठराव मंजूर केला तर न्यायालयात धाव घेणार असल्याचे शेख यांनी या वेळी स्पष्ट केले. प्रभारी नगराध्यक्षा आकांक्षा काळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, नगरसेवक गुरमुख नारंग, जब्बार शेख, नंदू पवार, अनिल साळवे, राजू बारवकर यांनी चर्चेत भाग घेतला. (वार्ताहर)दौंड येथील आरक्षण क्रमांक ५१ या जमिनीतील मूळ मालक अंबादास पवार यांनी सदरच्या आरक्षित जागेत शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, तसा सकारात्मक ठराव व्हावा अशी मागणी नगर परिषदेकडे केली आहे. परंतु १७ मे २0१३ रोजी नगर परिषदेने पवार यांना अतिक्रमण केल्याबाबत नोटीस पाठवली. तीस दिवसांच्या आत अतिक्रमण न काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कळवले. तेव्हापासून नगर परिषदेने मूळ मालकाला पाठविलेल्या नोटिशीचा काय पाठपुरावा केला याचा उलगडा अद्याप झाला नाही. एकीकडे अतिक्रमण केले म्हणून जागामालकाला नोटीस पाठवायची, दुसरीकडे त्यांच्याच आलेल्या पत्रावर चर्चा करायची. नगर परिषदेच्या या दुटप्पी धोरणाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे़