मुंबई : क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त करून देणारा द. आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जाँटी ऱ्होड्सला गुरुवारी मुंबईत सांताक्रूझ येथील एका हॉस्पिटलमध्ये कन्यारत्नाचा लाभ झाला. जाँटीने चिमुकलीचे नाव ‘इंडिया’ ठेवले आहे. आयपीएलनिमित्त जाँटी आणि जेने दाम्पत्य भारत दौऱ्यावर आहे. नॅचरल वॉटर बर्थ (नैसर्गिक पाण्यात जन्म) पद्धतीने जेनेची प्रसूती करण्यात आली. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ३.७१ किलो वजनाच्या ‘इंडिया’चा जन्म झाला.
जाँटीची बेबी ‘इंडिया’
By admin | Updated: April 25, 2015 05:45 IST