शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

जहाल नक्षलवाद्याला अटक

By admin | Updated: September 17, 2014 00:52 IST

जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत नक्षलविरोधी अभियान राबवत्ीा असताना जहाल नक्षलवादी राजू ऊर्फ जेठूराम बुधूराम धुर्वा (४१) याला पोलिसांनी छत्तीसगड

१६ लाखांचे होते बक्षीस : ११ घटनांमध्ये सहभागी होता नक्षलवादीगडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत नक्षलविरोधी अभियान राबवत्ीा असताना जहाल नक्षलवादी राजू ऊर्फ जेठूराम बुधूराम धुर्वा (४१) याला पोलिसांनी छत्तीसगड राज्यात अटक केली. ही कामगिरी गडचिरोली पोलीस पथकाने पार पाडली आहे. छत्तीसगड राज्याच्या सिमेलगत असलेल्या येनगाव जंगल परिसरात हा जहाल नक्षलवादी पोलिसांच्या हाती लागला. खडगाव ता. मोहल्ला जि. राजनांदगाव येथील रहिवासी असलेल्या राजूला मंगळवारी सकाळी ११ वाजता अटक केली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. राजू मानपूर डिव्हीजनचा डी. व्ही. सी. सदस्य आहे. औंधी एलओएसचा तो कमांडर आहे. २००७ नंतर पहिल्यांदाच गडचिरोली पोलीस प्रशासनाने एवढ्या मोठ्या कॅडरच्या नक्षलवाद्याला पकडण्यात यश मिळविले आहे. राजूच्या अटकेमुळे आता औंधी दलमजवळ कोणताही मोठा नेता उरलेला नाही. गहनगट्टा चकमकीदरम्यान दलमचा उपकमांडर मारला गेला होता. त्यामुळे हा दलम जवळजवळ संपुष्टात आला असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये राजूचा सक्रिय सहभाग आहे. धानोरा तालुक्यातील सावरगाव, मुरूमगाव, मुंगनेर, पेंढरी आदी भागात नक्षली कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. दलममध्ये भरती होण्यापूर्वी तो गावात राहून मिलीशीया सदस्य म्हणून काम करायचा. मानपूर डिव्हीजन एसझेडसी, पोलीट ब्युरो सदस्य गुडसा उसेंडी याने पाठवून दिलेले जिलेटीन व स्फोटक पदार्थ तसेच इतर साहित्य वेगवेगळ्या दलमला पोहोचविण्यासाठी मदत करण्याचे कामही राजू करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सप्टेंबर २००७ मध्ये पल्लेमाडी दलममध्ये हा सक्रिय सदस्य म्हणून भरती झाला. २००८ मध्ये मोहल्ला एलओएस म्हणून बदली होऊन २०१२ पर्यंत तो या पदावर कार्यरत होता. २०१२ मध्ये पल्लेमाडी दलममध्ये डीव्हीसी म्हणून बदली होऊन २०१३ पर्यंत कार्यरत व २०१३ पासून ते अटकेपर्यंत औंधी दलम प्रमुख म्हणून तो कार्यरत होता. राजूला अटक केल्यानंतर धानोरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द अपराध क्रमांक ४०/१२ कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), भादंवि ३/२५, भाहका या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंगनेर येथे झालेल्या चकमकीत राजू सहभागी होता. (स्थानिक प्रतिनिधी)