शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मुख्यालयाच्या पार्किंगसाठी प्राचीन मंदिरावर बुलडोझर?; स्थानिकांचा आक्रोश, लोक संतापले
2
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
3
पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त
4
'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा?
5
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
6
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
7
ते ६२, ती ४६! ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन चर्चेत का?
8
Nashik Mhada Lottery: सोन्याहून पिवळं! फक्त १४ लाखात नाशिकमध्ये म्हाडाचे घर, लोकेशन काय?
9
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
10
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
11
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
12
अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच
13
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
14
लेख: 'आदर' आदेश काढून 'मागायचा' की वर्तनातून मिळवायचा?
15
२४ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आता २० डिसेंबरला होईल मतदान
16
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
17
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
18
विशेष लेख: बहुराष्ट्रवादाची हार आणि जागतिक संस्थांची थडगी
19
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
20
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या उपाहारगृहात जंकफूडला बंदी

By admin | Updated: May 8, 2017 20:06 IST

साखर, मीठ आणि मेदाचा समावेश अधिक प्रमाणात असलेल्या जंकफूडला यापुढे राज्यातील शाळांमधील उपाहारगृहात बंदी असणार आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 8 - साखर, मीठ आणि मेदाचा समावेश अधिक प्रमाणात असलेल्या जंकफूडला यापुढे राज्यातील शाळांमधील उपाहारगृहात बंदी असणार आहे. जंकफूड खाल्ल्याने विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयरोग असे आजार वाढीस लागण्यास मदत होत असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारविषय अभ्यासासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने विद्यार्थ्यांच्या आहारातील पोषण मूल्ये सुधारून त्यांचा चांगल्या पद्धतीने शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. शाळेच्या उपाहारगृहात कोणते पदार्थ ठेवावेत व कोणते पदार्थ ठेवू नयेत, याबाबतही शिफारस करण्यात आली आहे. तसेच या उपाहारगृहांमध्ये साखर, मीठ आणि मेदाचे (जंकफूड) अधिक प्रमाण असलेले पदार्थ विकण्यास बंदी घालावी, असेही समितीचे सुचविले आहे. या शिफारशीनुसार राज्य शासनाने शाळांच्या उपाहारगृहांमध्ये जंकफूड ठेवण्यास व त्याची विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला असून त्यामध्ये पदार्थांची यादीही देण्यात आली आहे.जंकफूडमध्ये जीवनसत्वे व खनिजांची असणारी कमतरता आणि मीठ, साखर व मेदाचे असणारे अतिप्रमाण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि अन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे हे पदार्थ शाळांच्या उपाहारगृहात ठेवण्यात मनाई करण्यात आल्याचे शासन आदेश नमुद करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जंकफूड न खाण्याबाबत जनजागृती, समुपदेशन करण्याच्या सुचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळेचे भौगोलिक ठिकाण, ऋतू आणि परिसरातील खाण्याच्या सवयी विचारात घेऊन शाळांना या खाद्यपदार्थांशी साधर्म्य असणारे खाद्यपदार्थ निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.---------------उपाहारगृहांत हे पदार्थ ठेवावेत...१. गहू किंवा एकापेक्षा जास्त धान्याची रोटी/पराठा. यामध्ये ऋतूनिहाय भाज्या वापरलेल्या असाव्यात२. भात, भाजी पुलाव आणि डाळ३. भाजी पुलाव४. भात आणि काळा चना५. गव्हाचा हलवा सोबत काळा चना६. गोड दलिया सोबत नमकिन दलिया भाजी७. भात आणि पांढरा चना८. भात आणि राजमा९. कढी भात१०. गहू उपमा किंवा खिचडी, पपई/टोमॅटो/अंडी११. चिंचेचा भात, हिरवे चणे१२. भात, सांबर१३. इडली, वडा, सांबर१४. खीर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दही, ताक, लस्सी१५. भाज्यांचा उपमा१६. भाज्यांचे सॅण्डवीच१७. भाज्यांची खिचडी१८. नारळाचे पाणी, शिकंजी, जलजीरा इ.-------------------उपाहारगृहात हे पदार्थ नसावेत१. तळलेले पदार्थ जसे बटाट्याचे व इतर चिप्स२. शीतपेय, सरबत, बर्फाचा गोळा ३. सर्व प्रकारची मिठाई४. नुडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणी-पुरी, गोल गप्पे५. सर्व प्रकारच्या चघळण्याच्या गोळ््या आणि कँडी६. जिलेबी, इमरती, बुंदी इ. (३० टक्के पेक्षा जास्त शर्करायुक्त असलेले पदार्थ)७. सर्व प्रकारची चॉकलेट्स८. केक आणि बिस्कीट९. बन्स आणि पेस्ट्री१०. जाम आणि जेली