शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पालिकेची गर्भवतींसाठी कावीळ जनजागृती

By admin | Updated: August 4, 2016 05:18 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईत गॅस्ट्रो, कावीळ असे आजार वाढत आहेत. गर्भवतींना काविळीची लागण झाल्यास त्यांच्या गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी गर्भवतींनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती देण्यासाठी बोरीवलीतील आर-मध्य विभागात जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू झाल्यावर अनेक विभागांमध्ये गढुळ पाणी येते. अनेकदा काही ठिकाणी जलवाहिनी किरकोळ फुटलेली असते. त्याच्या जवळून सांडपाणी जात असल्यास जलवाहिनीत सांडपाणी मिसळते. त्यामुळे गढूळ पाणी येते किंवा पावसाळ््यात जलवाहिनीत माती मिसळली जाते. याचबरोबर रस्त्यावरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळेही त्रास होऊ शकतो. दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमुळे हेपॅटायटिस ‘ए’ आणि ‘ई’ होण्याचा धोका असतो. या विषाणूंची लागण होणे सहज टाळता येऊ शकते, अशी माहिती या विभागात राहणाऱ्या नागरिकांना देण्यात आली. या विभागातील गर्भवतींना माहितीपत्रके वाटण्यात आली. यामध्ये हेपॅटायटिसचे प्रकार, लक्षणे, कोणती काळजी घ्यावी, अशी सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे. हेपॅटायटिस ‘बी’च्या विषाणूंची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हेपॅटायटिस टाळता येणे शक्य असल्याचे या जनजागृती मोहिमेत नागरिकांना सांगण्यात आले. (प्रतिनिधी) >हेपॅटायटिसची लक्षणेमळमळणेभूक मंदावणेअशक्तपणाडोळे पिवळे दिसणेकणकण येणेहेपॅटायटिस टाळण्यासाठी पाणी उकळून, गाळून प्या.उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.आजारी पडल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाऊन या.