शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळात कनिष्ठ-वरिष्ठ वादाची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 06:22 IST

एसटी फे-यांतील तोट्यासाठी कनिष्ठ अधिका-यांना जबाबदार धरत, महामंडळाने ५० टक्के वेतन कपातीचा निर्णय घेतला आहे, पण उच्चपदस्थ अधिका-यांवर मात्र

मुंबई : एसटी महामंडळाच्या आततायी निर्णयामुळे पुन्हा एकदा कर्मचाºयांमध्ये नाराजी पसरली आहे. एसटी फे-यांतील तोट्यासाठी कनिष्ठ अधिका-यांना जबाबदार धरत, महामंडळाने ५० टक्के वेतन कपातीचा निर्णय घेतला आहे, पण उच्चपदस्थ अधिका-यांवर मात्र कोणतीही कारवाई होणार नाही. या निर्णयामुळे विभाग स्तरावरील अधिकाºयांमध्ये नाराजी पसरली असून, कनिष्ठ विरुद्ध वरिष्ठ असा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.विभागीय स्तरावरील शटल आणि विनावाहक एसटी फेºयांबाबत त्रैमासिक आढावा बैठक एसटी मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील सर्व विभागांमध्ये २५ ते ३० टक्के व त्यापेक्षा जास्त प्रमाणात फेºयांमध्ये घट झाल्याने, एसटीचे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून आले. या नुकसानीसाठी कनिष्ठ अधिकाºयांना दोषी ठरविण्यात आले. त्यानुसार, एसटी मुख्यालयातून ‘अत्यंत तातडीचे’ असे परिपत्रक काढण्यात आले. यात विभागीय पातळीवरील शटल व विनावाहक सेवा रद्द झाल्यास, त्यासाठी आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभाग नियंत्रक अधिकाºयांना जबाबदार धरण्यात येणार आहे, तर नुकसान भरपाई म्हणून आगार व्यवस्थापक ५० टक्के, विभागीय वाहतूक अधिकारी ३० टक्के आणि विभाग नियंत्रक २० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कपात १ आॅक्टोबरपासून लागू करण्यात येणार असल्याचेदेखील परिपत्रकात स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे विभाग स्तरावर मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. एसटीच्या शटल आणि विनावाहक फेºयांमध्ये धावणाºया एसटी गाड्यांची स्थिती योग्य नसते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे फेरी पूर्ण करण्यास विलंब होतो. त्यामुळे योग्य वेळेत शटल सोडणे शक्य होत नाही. स्थानक-आगारांजवळ पर्यायी वाहन व्यवस्था उपलब्ध असल्याने, त्याचा वापर प्रवाशांकडून केला जातो, असे असूनही विभागीय स्तरावरील अधिकारी अतिरिक्त ड्युटी करतात. त्यामुळे वेतन कपातीतून नुकसान भरपाई करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे अधिकारी सांगतात.विशेष म्हणजे, संबंधित अधिकाºयांना अडचणींबाबत माहिती देण्यात येते. मात्र, त्यांच्याकडून उपाययोजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे अशा अधिकाºयांवर मात्र कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. या निर्णयामुळे एसटीत कनिष्ठ आणि वरिष्ठ या वादाला सुरुवात होण्याची शक्यता एसटी सूत्रांनी वर्तविली आहे.